Lalit Patil News : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत करणारा दत्ता डोके अटकेत

Sassoon Hospital Drug Racket : ससून रुग्णालयातील कोठडीतून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत होता.
Lalit Patil
Lalit Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune Drugs Case : ड्रग तस्करी करणारा ललित पाटील ससूनमधून (sasoon hospital drug racket) पळून गेल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे. ललित पाटील यास पळून जाण्यास मदत करणाऱ्या कारचालकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

दत्ता डोके असे त्या कारचालकाचे नाव आहे. बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. डोके याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास दत्ता डोके याने मदत केल्याचा आरोप आहे.

Lalit Patil
Sanjay Raut News : महापालिकांच्या निवडणुका कधी घेणार? संजय राऊतांचा निवडणूक आयोगाला सवाल

येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत होता. ससून रुग्णालयातील कोठडीतून ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत होता. चार दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने हे ड्रग्ज रॅकेट उघड करताना ललित पाटीलच्या दोन साथीदारांना दोन कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह अटक केली होती. मात्र, त्याच्या दुसर्‍याच दिवशी ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला. त्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन दत्ता डोके याला अटक केली आहे. डोके एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाकडे चालक आहे. शिक्षण संस्थाचालकावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी तो ससूनमध्ये उपचार घेत होता. त्याच्या मोटारीवरील चालक दत्ता डोके याची अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची रुग्णालयात ओळख झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ललित पाटील हा पळून गेल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. मेफेड्रॉन तयार करणारी त्याची टोळी ज्यामध्ये भूषण पाटील या त्याच्या भावाचाही समावेश आहे. ललित वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज विक्री करत होता. त्याच्या ड्रग्ज विक्रीची सुरुवात नेमकी कशी आहे? तो ड्रग्ज विक्री नेमका कसा करायचा? याचा तपास पोलिस करीत आहेत.

Lalit Patil
Babanrao Lonikar News: मी मंत्री होणार की नाही हे देव अन् देवेंद्र यांच्याच हातात; बबनराव लोणीकरांची मिश्किल टिप्पणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com