Gautami Patil Politics: गौतमीचा नादच खुळा; तिच्यामुळे दोन पाटील भिडले !

Pune Politics : दोन दिवसांपूर्वी काही संघटनांनी गौतमीने तिच्या नावपुढे पाटील आडनाव लावून नये अशी मागणी केली होती.
Gautami Patil Politics:
Gautami Patil Politics:Sarkarnama
Published on
Updated on

Dilip Mohite Patil and Adharao Patil clashed : नृत्यांगना गौतमी पाटीलवरुन आता राज्याचं राजकारण चांगलेच तापू लागलं आहे. गौतमीवरुन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हेच भिडल्याचं पहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी काही संघटनांनी गौतमीने तिच्या नावपुढे पाटील आडनाव लावून नये अशी मागणी केली होती. पण हा मुद्दा खोडून काढत दिलीप मोहिते पाटील यांनी "गौतमी पाटील गरीब परिस्थितीमधून पुढे आली आहे, तिला संपवू नका. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जेवढी गर्दी जमत नाही तेवढी गर्दी गौतमीच्या एका कार्यक्रमाला जमते. ऐवढा मोठा तिचा चाहता वर्ग आहे.आजकाल राज्यात अनेकजण आपल्या नावापुढे पाटील आडनाव लावतात.''असं सांगत गौतमीला (Gautami Patil) संपवू नका, असं आवाहन केलं होतं. दिलीप मोहिते-पाटील त्यांच्याच वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात गौतमी विषयी बोलले होते.

Gautami Patil Politics:
Karnataka Hijab Row: 'हिजाब' वरील बंदी उठणार? ; शिक्षणमंत्र्यांच्या विधानामुळे कर्नाटकात..

पण त्यांच्या या वक्तव्यावरुन खेडचे माजी खासदार आढाळराव पाटील यांनी दिलीप मोहिते पाटलांवरच (Dilip Mohite Patil) निशाणा साधला आहे. ''खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील वादग्रस्त विधान करणार अज्ञानी आमदार आहे. तो वेड्यांच्या नंदनवनात जगत असतो. काहीही कारण नसताना कोणावरही तोंडसुख घेणे, आरोप करणे ही त्यांची जुनी सवय आहे. पण मुख्यमंत्र्याची तुलना गौतमीशी करणं हे निर्बुद्धपणाचे लक्षण आहे असं मी समजतो.'' अशा शब्दातं आढाळराव पाटील यांनी मोहिते पाटलांना सुनावलं आहे.

Gautami Patil Politics:
Eknath Shinde News: सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स'वर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

यासंदर्भात गौतमी पाटीलला विचारले असताना तिने मात्र यावर प्रतिक्रिया देणे टाळलं आहे. प्रेक्षकांचे माझ्यावर असलेले प्रेम असल्याने माझ्या कार्यक्रमाला गर्दी होते, अंस उत्तर तिने दिलं आहे. पण राजकारणाशी दूरदूरपर्यंत संबंध नसणाऱ्या गौतमीमुळे मात्र राजकीय नेतेमंडळींमध्ये मात्र चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com