अजित पवारांची डोकेदुखी वाढली; भाजपचे राष्ट्रवादीच्या नाराजांवर लक्ष

सत्ताधाऱ्यांना आव्हान देणे आजिबात सोपे नसल्याने भाजप सक्षम उमेदवारांच्या शोधात आहे.
AjitPawar-Someshwar SugarFactory
AjitPawar-Someshwar SugarFactorySarkarnama

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत २१ जागांसाठी साडेचारशेपेक्षा अधिक अर्ज असल्याने राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींपुढे कोणाला निवडावे ही डोकेदुखी आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश इच्छुक ‘टाईट फिल्डींग' लावून अजित पवारांपर्यंत आपले नाव पोचावे, यामध्ये पूर्णवेळ व्यस्त आहेत. दरम्यान, काँग्रेसने राष्ट्रवादीची सोबत कायम ठेवली आहे. याशिवाय सतीश काकडे यांच्या शेतकरी कृती समितीच्या गोटात शांतता आहे, तर दुसरीकडे भाजप पुरस्कृत पॅनेल मात्र सक्षम उमेदवारांच्या शोधात असून 'नाराज' उमेदवारांवर 'लक्ष' ठेवून आहे. (Eection of Someshwar factory, 535 applications of 476 candidates became eligible)

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ४७६ लोकांचे ५३५ अर्ज उमेदवारीस पात्र ठरले आहेत. भाजपपुरस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलकडून ३०, शेतकरी कृती समितीकडून ५० तर उरलेले सर्व अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल करण्यात आलेले आहेत. सत्ताधारी निश्चिंत असून कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या पुढाकारातू गावोगाव प्रचारदौराही सुरू आहे. पण त्यांच्यापुढे डोकेदुखी आहे ती साडेचारशे अर्जांमधून २१ जण निवडण्याची. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलमधून विद्यमान अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माजी अध्यक्ष शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, दत्ता चव्हाण, शिवाजीराजे निंबाळकर, काँग्रेस नेते नंदकुमार जगताप या दिग्गजांचे अर्ज आहेत. शेतकरी कृती समितीकडून नेते सतीश काकडे, कल्याण भगत, अप्पाजी गायकवाड यांचे, तर भाजप पुरस्कृत पॅनेलकडे दिलीप खैरे, पी. के. जगताप, बाळासाहेब भोसले यांचे अर्ज आहेत.

AjitPawar-Someshwar SugarFactory
संतापजनक : वाळूमाफियाने वाहन अंगावर घालून पोलिस कर्मचाऱ्यास चिरडले

काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी मागील पंचवार्षिकप्रमाणेच अजित पवारांसोबत राहणार असल्याचे जाहीर केले असून शेतकरी कृती समितीच्या पातळीवर निवडणुकीच्या फारशा हालचाली नसल्याने बिनविरोध होणार का, अशी चर्चा होती. परंतु भाजप नेते जालिंदर कामठे, गणेश भेगडे, दिलीप खैरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना आव्हान देणे आजिबात सोपे नसल्याने सक्षम उमेदवारांच्या शोधात ते आहेत. अर्ज माघारीची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर असली तरी राष्ट्रवादी पुढील चार दिवसांत २१ जणांचा पॅनेल जाहीर करेल, अशी शक्यता आहे. त्यानंतर कृती समितीचे अथवा राष्ट्रवादीचे नाराज हेरूनच भाजप पॅनेल जाहीर करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तरीही राष्ट्रवादीची सद्यस्थिती पाहता नाराज मंडळी मागील जिल्हा परिषदेप्रमाणे बंडखोरी करतील, अशी शक्यता फार कमी आहे.

AjitPawar-Someshwar SugarFactory
माझ्या मतदारसंघाचा निधी मी इतरत्र वळवू देणार नाही; भले त्यासाठी संघर्षही करेन

सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार की लढत होणार हा कार्यक्षेत्रात कळीचा प्रश्न आहे. आज पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ‘मी आमच्या विचारांचा २१ जणांचा पॅनेल जाहीर करणार आहे. बाकीच्यांनी काय करावं, हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे’ असे दुसऱ्यांदा स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक होईल, असे संकेत मिळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com