Hemant Rasane-Ganesh Bidkar-Sharad Butte Patil
Hemant Rasane-Ganesh Bidkar-Sharad Butte PatilSarkarnama

Pune News : रासनेंपाठोपाठ गणेश बीडकरांनाही धक्का : या समितीवरील नियुक्ती रद्द; बुट्टे पाटलांना संधी!

Pune District Planning Committee: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो.

आंबेठाण (जि. पुणे) : कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasane) यांना पराभवाची धक्का सहन करावा लागला. या मतदारसंघातील भाजपचे नेते तथा नगरसेवक गणेश बीडकर (Ganesh Bidkar) यांनाही धक्का बसला आहे. बीडकर यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर झालेली निवड रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिडकर यांची नियुक्ती रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Election of Sharad Butte Patil to Pune District Planning Committee)

काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा नियोजन समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. त्यात खेड तालुक्यातून बुट्टे पाटील यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा तालुक्यातील त्यांच्या समर्थकांना होती. परंतु त्यावेळी त्यांना संधी मिळाली नव्हती.

 Hemant Rasane-Ganesh Bidkar-Sharad Butte Patil
Kasba By Election Result: धंगेकरांनी ‘महाशक्ती’ला दाखवला ‘कात्रजचा घाट’: भाजपचा बालेकिल्ला २८ वर्षांनंतर उद्‌ध्वस्त

शरद बुट्टे पाटील यांनी यापूर्वी देखील जिल्हा नियोजन समितीवर काम केले आहे. राज्यात पंचायत राज व्यवस्थेचे अभ्यासक म्हणून त्यांना ओळखले जाते. या निवडीने त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे बुट्टे पाटील यांना संधी देताना भाजपच्या बीडकर यांची निवड रद्द करण्यात आल्याने जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

खेड तालुक्यातून आता माजी सभापती आणि आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर विरोधक भगवान पोखरकर आणि शरद बुट्टे पाटील हे जिल्हा नियोजनमध्ये तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

 Hemant Rasane-Ganesh Bidkar-Sharad Butte Patil
Supreme Court News : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय : केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड होणार समितीद्वारे; केंद्राला धक्का

माझी झालेली निवड ही सेवेची एक संधी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मनापासून आभार मानतो. विशेष करून माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचेही आभार मानतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com