Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिरुर-हवेली मतदारसंघाचे आमदार अॅड.अशोक पवार यांनी मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला. अशोक पवार हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. असे असले तरी त्यांनी शरद पवारांची साथ दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार अशोक पवार यांनी आता मास्टर स्ट्रोक मारत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंचे माजी संचालक दिवंगत अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड यांची थेट युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदावर वर्णी लावून घेतली आहे.
कोंढापुरीचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीवेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, महेबूब शेख यांच्यासह आदी उपस्थित होते.
स्वप्निल गायकवाड हे आमदार अशोक पवार यांचे समर्थक व कोंढापुरी (ता.शिरूर) या गावचे माजी सरपंच आहेत. त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे जिल्ह्यात संघटनात्मक कामाला प्राधान्य देणार असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटनात्मक काम करण्यावर आपण भर देणार असल्याचे निवडीनंतर स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.