Dress Code In Temples : मंदिरातील पुजाऱ्यांनाही वस्त्रांचे नियम लागू करा; मिटकरींची मागणी, तर दवे म्हणतात..

Amol Mitkari On Anand Dave News : पुजाऱ्यांनीही अर्धवट कपड्यात राहू नये.
Dress Code In Temples
Dress Code In TemplesSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मंदिरामध्ये लागू केलेल्या वस्त्रसंहितेवरून आता राजकीय वार-पलटवार सुरू झाले आहे. मंदिरातल्या पुजाऱ्यांनाही वस्त्रसंहिता लागू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तर अमोल मिटकरी आणि हिंदू धर्माचा संबंधच काय असा सवाल हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केला आहे. यामुळे आता मंदिरातील वस्त्रसंहितेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Dress Code In Temples
Pune News : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार का ? ; अजितदादांनी सांगितली आतल्या गोटातील माहिती..

मंदिरातील वस्त्रसंहितेबाबत प्रतक्रिया व्यक्त करताना आमदार मिटकरी म्हणाले, "अर्धवट वस्त्रांमध्ये मंदिरात जावू नये हा निर्णय जर लागू केला जात असेल तर पुजाऱ्यांनीही अर्धवट कपड्यात राहू नये. शेवटी नियमावली सर्वांना सारखी असली पाहिजे. त्यामुळे महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहतात अन् अशा गोष्टी पुढे येतात. वस्त्रसंहिता जर लागू केला असेल तर तो पुजाऱ्यांसाठीही तो लागू करावा, एवढं माझं म्हणणं आहे. अशी माझी मागणी मंदीर समीतीकडे राहिल."

Dress Code In Temples
Gautami Patil : माधुरी दीक्षितला हा सल्ला कुणी दिला नाही..; गौतमीसाठी अंधारेंची 'पाटीलकी'...

मिटकरींच्या या मागणीवर हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दवे म्हणाले की, " पुजारी सोहळे घालतात, ते पूर्ण पायापर्यंत असतं. तो काही विचित्र प्रकार नसतो. अंगावरसुद्धा ते पुर्णपणे उपरणे घेतात. माझं म्हणणं असं आहे की, त्यात काही विचित्रपणा असता, आजपर्यंत कोणत्याही भाविकांनी तक्रार केलेली नाही. अमोल मिटकरी यांच्या पूर्वजांनीसुद्धा तक्रार केलेली नाही, असा पलटवार त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com