पुणे विद्यापीठाचं मोठं पाऊल; विद्यार्थ्यांना आशा भोसले, नवाजुद्दीन देणार धडे

काही अभ्यासक्रमांचे धडे नि:शुल्क दिले जाणार आहेत.
Nawazuddin Siddiqui, Asha Bhosle
Nawazuddin Siddiqui, Asha BhosleSarkarnama
Published on
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) आता पदवीचे शिक्षण घेत असताना पदवीबरोबरच संबंधित विषयातील अद्यायावत ज्ञान व कौशल्ये विद्यार्थ्यांना आत्मसात करता येणार आहेत. 'डिग्री प्लस' (Degree Plus) या ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून काही अभ्यासक्रम मोफतही तर काही अत्यंत कमी शुल्कामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

सध्या या अभ्यासक्रमांमध्ये केवळ विद्यापीठ व विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता येईल. 'डिग्री प्लस' या ऑनलाईन उपक्रमांतर्गत अनेक शैक्षणिक संस्था, कंपन्या, विशेष शिक्षण देणाऱ्या संस्था अशा अनेक संस्थांबरोबर करार करण्यात आले आहेत. त्यानुसार नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये एडब्लूएस अकॅडमी, ईडीएक्स, सिम्प्ली लर्न, ई कीडा, सेलिब्रिटी स्कुल, कॅटलिस्ट वेल्थ, हार्वर्ड बिझिनेस ऑनलाईन अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यातील काही अभ्यासक्रम हे नि:शुल्क आहेत तर काही अभ्यासक्रम कमी किंमतीत उपलब्ध असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

Nawazuddin Siddiqui, Asha Bhosle
नवाब मलिकांनी न्यायालयात मागितली बिनशर्त माफी!

सेलिब्रिटी स्कुल अंतर्गत चालणाऱ्या अभ्यासक्रमात आशा भोसले (Asha Bhosle) या संगीताचे, नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) अभिनयाचे, मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) दिग्दर्शनाचे, सबिरा मर्चंट कम्युनिकेशनचे धडे देणार आहेत. उपक्रमाविषयी माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, डिग्री प्लस च्या माध्यमातून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्दीमत्ता, क्लाउड कॉम्पटिंग, उत्पादन क्षेत्र, अर्थशास्त्र, माध्यम, संस्कृती आदी क्षेत्रात त्यांची ज्ञानवृध्दी करता येईल. सध्या प्रायोगिक तत्वावर हे व्यासपीठ सुरू केले आहे.

या माध्यमातून १३० प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यापुढे ही संख्या २०० च्याही पुढे जाईल, असे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी सांगितले. तर या विविध अभ्यासक्रमांसाठी त्या-त्या विषयातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य म्हणजे हे सर्व कोर्स बाजार किमतीपेक्षा कमी शुल्कात मिळणार असल्याचे नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी नमूद केले.

अभ्यासक्रमांच्या नावनोंदणीला आता सुरुवात झाली आहे. अभ्यासक्रमाच्या तारखा संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना http://degreeplus.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल. अभ्यासक्रमांची यादीही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com