Exit Polls 2023 : एक्झिट पोलचा अंदाज : त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपला बहुमत तर मेघालयमध्ये त्रिशंकू

BJP and Congress Politics : कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
BJP and Congress
BJP and CongressSarkarnama

Exit Polls 2023 : ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडलं. यामध्ये मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यातील मतदान पूर्ण झालं. आता २ मार्चला निकाल लागणार आहे. त्यामुळे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येणार? हे निकालानंतरच समोर येणार आहे. पण त्या आधी या तीनही राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत.

या एक्झिट पोलनुसार, कोणत्या राज्यात आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याबाबतचा एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो? याविषयी वेगवेगळ्या सर्वेक्षणांवर एक नजर टाकूयात...

BJP and Congress
Thackeray group : शिवसेनेचा ठाकरे गट बेघर; लेखी मागणीनंतरच कार्यालय मिळणार!

त्रिपुरामध्ये कोणत्या पक्षाला बहुमत?

- ऍक्सिस-इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार, त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये भाजपला 36 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच डाव्यांना 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता. याबरोबरच तृणमूल काँग्रेसला 9 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

'झी मॅट्री'च्या एक्झिट पोलनुसार, त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 29 ते 36 जागा मिळण्याची शक्यता. तर डाव्यांना 13 ते 21 जागांवर आघाडी मिळण्याची शक्यता.

BJP and Congress
Bacchu kadu : बच्चू कडू यांना मोठा दिलासा; न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; काय आहे प्रकरण?

नागालँडमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत?

- मेट्रिजच्या एक्झिट पोलनुसार, नागालँडमध्ये भाजपला 35 ते 43 जागा, एनएफपीला 2 ते 5 जागा, एएनपीला 1 जागा, काँग्रेसला 1 ते 3 जागा व इतर 6 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे.

- इंडिया टुडेच्या अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, नागालँडमध्ये भाजप आणि एनडीपीपीला 38 ते 48 जागा मिळण्याची शक्यता. तर काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता. तसेच एएनपीला 3 ते 8 जागा मिळण्याची शक्यता.

BJP and Congress
CM : अधिकारी म्हणतो; आता नकाच देऊ पदोन्नती, मुख्यमंत्र्यांकडे अडकली होती फाईल !

मेघालयमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत?

- मेट्रिजच्या एक्झिट पोलनुसार, मेघालयमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मेघालयमध्ये एनपीपीला 21 ते 26 जागा, तसेच टीएमसीला 8 ते 11 जागा, भाजपला 6 ते 11 जागा आणि काँग्रेसला 3 ते 6 जागा तसेच इतर 10 ते 19 जागा मिळण्याची शक्यता आहे.

- इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 4 ते 8 जागा मिळण्याची शक्यता. तर काँग्रेसला 6 ते 12 जागा मिळण्याची शक्यता. तर एनपीपीला 18 ते 24 जागा मिळण्याची शक्यता. या अंदाजानुसार एनपीपी राज्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, मेघालयमध्ये त्रिशंकू परिस्थिती तयार होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरी निकाल लागल्यावरच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे समोर येणार आहे. त्यामुळे २ मार्चला निकालानंतर सर्व स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com