Maval News : सोन्याचे अंडे देणाऱ्या मावळात वाढली लाचखोरी ; आठ दिवसांतच एसीबीचा झाला दुसरा ट्रॅप

ACB News : आठच दिवसांत मावळ तालुक्यात एसीबीचा दुसरा ट्रॅप मावळ तालुका पंचायत समितीत गुरुवारी झाला.
bribe News
bribe NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी त्याच्या एक टक्का लाच मागणारा मावळ तालुक्यातील (जि. पुणे) तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा अकाऊंटट नरेंद्र अनंतराव कणसे (वय 55) याला गेल्या बुधवारी (२७ सप्टेंबर) एसीबीने दणका दिला होता. त्यानंतर आठच दिवसांत मावळ तालुक्यात त्यांचा दुसरा ट्रॅप मावळ तालुका पंचायत समितीत गुरुवारी (ता.५) झाला. विस्तार अधिकारी अंकुश किसन खांडेकर (वय 57) चाळीस हजाराची लाच घेताना पकडला गेला. त्याच्या रिटायरमेंटला एक वर्षच राहिले होते.

कोवीड काळात पुरविलेले सॅनिटायझर व उभारलेल्या गॅस शवदाहिनीचे बिल मंजूर करण्यासाठी कणसेने नगरपरिषदेच्या ठेकेदाराकडे बिलाच्या एक टक्का म्हणजे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर आठच दिवसांत आज सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असलेल्या मावळातच एसीबीचा (ACB) दुसरा ट्रॅप झाला.

bribe News
Sanjay Raut Criticized Fadanvis : दिल्लीनेच फडणवीसांचं मातेरं केलं; राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं

त्यातून मावळात (Maval) वाढत चाललेल्या खाबूगिरीवर शिक्कामोर्तब झाले. तेथील सरकारी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली. कणसेने लाच घेतलेला नगरपरिषदेचा ठेकेदार ३८ वर्षीय तरुण होता. आजच्या घटनेत ठेकदाराच्या वीस वर्षाच्या मॅनेजर युवकाकडून लाच घेतली गेली. तक्रारदार युवक हा जागृती एंटरप्राइजेस मध्ये साईट मॅनेजर आहे लोहगडावर बारा सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे त्यांच्या फर्मचे एक लाख ४४ हजार रुपयांचे टेंडर मंजूर झाले होते.

त्याची वर्कऑर्डर देण्यासाठी खांडेकरने टेंडरच्या २८ टक्के म्हणजे चाळीस हजार रुपये लाच मागितली. पण, ती द्यायची नसल्यााने त्यांनी एसीबीत तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पीआय विद्युलता चव्हाण व पथकाने सापळा रचून खांडेकरला दुपारी रंगेहाथ पकडले. नंतर त्याच्याविरुद्ध वडगाव मावळ पोलीस (Police) स्टेशनला लाचखोरीचा गुन्हाही दाखल केला.

Edited by : Amol Jaybhaye

bribe News
Anna Hazare On Awhad : आमदार जितेंद्र आव्हाडांना 'ते' ट्विट भोवणार; अण्णा हजारे अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com