Sanjay Raut Criticized Fadanvis : दिल्लीनेच फडणवीसांचं मातेरं केलं; राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं

Maharashtra Politics : वर्षभरात फडणवीसांनी काय केलं, हे त्यांनीच सांगावं
Sanjay Raut Criticized Fadanvis
Sanjay Raut Criticized FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics : 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस मी माझ्या आयुष्यात पहिला नाही, हे दुर्दैवाने आज मला म्हणावं लागतंय. फक्त महाविकास आघाडीतील नेत्यांना बदनाम करण्याचं त्यांचं काम सुरू आहे. गेल्या वर्षभरात फडणवीसांनी काहीच केलं नाही,' अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते दिल्लीत बोलत होते.

राऊत म्हणाले, 'कधी शरद पवार तर कधी उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमा मलिन करण्यापलीकडे त्यांनी काय केलं, हे त्यांनी सांगावं, असा सवालही राऊतांनी विचारला. ज्याला तुम्ही तुरुंगात टाकायला निघाले होते. त्या सिंचन घोटाळ्यातील आरोपी आज तुमच्या शेजारी बसला आहे. शिंदे गटातील २५-३० आमदारांवर ईडी, सीबीआय'च्या कारवाया सुरू आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच का बोलत नाहीत; मग भूतकाळात काय घडलं आणि नाही त्यावर चर्चा करा. महाराष्ट्रात मृत्यूचं तांडव सुरू आहे, त्यावर बोला.

Sanjay Raut Criticized Fadanvis
Hasan Mushrif News : कोल्हापूर लोकसभेची बंदूक हसन मुश्रीफांच्या खांद्यावर; नेम धरून युती कुणाचा 'गेम' करणार?

एक भंपक माणूस तुम्ही राजभवनात आणून बसवला होता. त्याकाळात राजभवनाचा राजकीय अड्डाच झाला होता. तुम्ही काय आमच्यावर आरोप करता, फडणवीस स्वत:च स्वत:चा अपमान करून घेत आहेत. दिल्लीनेच फडणवीसांचं मातेरं आणि पोतेरं करून ठेवलंय. ते पाहून आम्हालाच त्यांची लाज वाटते. तुम्ही तुमचं मातेरं करून घेतलं आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, भाजप हा मोठा भाऊ आहे. त्यामुळं मोठ्या भावाला तडजोडी कराव्या लागत आहेत. यासाठीच की शिवसेना आणि मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना सत्तेपासून दूर ठेवायचे, मग महाराष्ट्रात चोर लुटारूंच्या हाती गेला तरी चालेल, महाराष्ट्राची इभ्रत धुळीला मिळाली तरी चालेल. महाराष्ट्रात अनागोंदी, अराजकता निर्माण झाली तरी चालेल.

नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेडमध्ये आरोग्य विभागात सरकारी रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरू आहे. फडणवीसांच्या नागपुरातच सरकारी रुग्णालयात रुग्णांचे मृत्यू होत आहेत. राज्यात मृत्यूचं तांडव सुरू असताना सत्तेतील तीनही पक्ष रुसव्या फुगव्यातच अडकले आहेत. कुणाला पालकमंत्रिपद हवंय, कुणाला मंत्रिपद हवंय, कुणाला महामंडळाचं वाटप करायचं आहे. यातच हे तीनही पक्ष अडकले आहेत, पण राज्यात इतकं काही सुरू असतानाही त्या वेदनेची रेषाही या तीनही पक्षांतील एकाही नेत्याच्या चेहऱ्यावर दिसली नाही. हे राज्याचं दुर्दैव आहे.

एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. पाच वर्षे काय, कोर्टाने आणि विधानसभा अध्यक्षांनी कायद्याने वागायचं ठरवलं तर पाच वर्षे काय पाच मिनिटेही ते मुख्यमंत्रिपदावर राहू शकत नाहीत. ते बेकायदेशीरपणेच बसवले आहेत. घटनेने, कायद्याने वागलात तर अजित पवार यांची आमदारकी जाईल, २०२४ नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीसांनाही धक्का बसला असेल.

Edited By- Anuradha Dhawade

Sanjay Raut Criticized Fadanvis
Mitkari Threatened Walse Patil : आमदार अमोल मिटकरींनी थेट वळसे पाटलांनाच दिली धमकी; नेमकं काय घडलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com