फडणवीसांनी आपल्या लाडक्या पदाधिकाऱ्याची मागणी केली पूर्ण...

Devendra Fadnavis : मॉस्कोतील अण्णाभाऊंच्या अर्धपुतळ्यााचे अनावरण येत्या १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
Devendra Fadnavis News, Political News in Marathi
Devendra Fadnavis News, Political News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को, रशिया या संस्थेच्या प्रांगणात बसविल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या संस्थेचे आज अभिनंदन करण्यात आले.

या संस्थेचे अभिनंदन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे त्यांचे लाडके पदाधिकारी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष पिंपरी-चिंचवडकर अमित गोरखे, पुण्यातील भाजप (BJP) आमदार सुनील कांबळे आणि आय़एफएस अधिकारी सुनील वारे यांनी फडणवीसांकडे या महिन्याच्या १७ तारखेला केली होती. (Devendra Fadnavis News, Political News in Marathi)

Devendra Fadnavis News, Political News in Marathi
मुख्यमंत्री शिंदेंची जोरदार फटकेबाजी अन् आव्हाडांनी हातच जोडले...

2020 हे वर्ष अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा रशियात अर्धाकृती पुतळा बसविणे ही बाब महाराष्ट्रासह देशाचा मान व शान वाढणारी आहे,असे नमूद करीत विधानपरिषद व विधानसभेत रशियन लायब्ररीच्या अभिनंदनाचा ठराव पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंजूर केला गेला.हा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत करण्यात आला.

अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षासाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपयांची तरतूद आणि विविध कार्यक्रमांचे आय़ोजन केले होते. मात्र, कोरोनामुळे हे वर्ष मोठ्या जोमाने साजरे करता आले नव्हते.दुसरीकडे याच काळात अण्णाभाऊंच्या साहित्याचा, कर्तृत्वाचा आणि भारत रशिया संबंधांमध्ये दृढीकरणाच्या अनुषंगाने अण्णाभाऊंच्या महान कार्याला सलामी म्हणून मास्को येथील Maragarita Rodomino All Russia State Library for Foreign Literature या जगप्रसिद्ध ग्रंथालयाने आपल्या प्रांगणात म्हणजे मास्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींसोबत अण्णाभाऊंचा अर्धाकृती पुतळा उभारला. म्हणून सदर संस्था तथा लायपब्ररीचे अभिनंदन करण्यासाठी गोरखेंनी फडणवीस यांचीराज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुंबईत भेटून त्यांना पत्र दिले होते.

Devendra Fadnavis News, Political News in Marathi
'RSS' च्या संमतीनेच गडकरींचा पत्ता कट...

मॉस्कोत अण्णाभाऊंचा अर्धपुतळा म्हणजे भारत महाराष्ट्रासह देशाचा मोठा गौरव असून महाराष्ट्राची शान असल्याने तो उभारलेल्या संस्थेचा गौरव करण्यात यावा,असे त्यात म्हटले होते. "ही महाराष्ट्र विधानसभा मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मास्को, रशिया यांनी महाराष्ट्र पुत्र साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविल्या प्रकरणी या संस्थेचे अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करत आहे" हा अभिनंदन प्रस्तावाचा मसुदाही गोरखे यांनी दिला होता.त्यांची ही मागणी आठवड्यातच फ़डणवीसांनी मान्यच केली नाही,तर रशियन लायब्ररीच्या अभिनंदनाचा गोरखेंचा प्रस्ताव जसाच्या तसा विधीमंडळात एकमताने मंजूरही केला.

दरम्यान,मॉस्कोतील अण्णाभाऊंच्या अर्धपुतळ्यााचे अनावरण येत्या १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नारायणस्वामींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून फडणवीस, गोरखेंसह आणखी काहीजण या अनावरणाला जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com