Devendra Fadanvis on PCMC: पिंपरी-चिंचवडच्या पाण्यावर फडणवीसांनी काढला 'हा' तोडगा

PCMC News | शहरी पिण्याच्या आणि ग्रामीण पाणी (सिंचनाच्या) भांडणावर उतारा सांगितला.
Devendra Fadanvis on PCMC:
Devendra Fadanvis on PCMC:Sarkarnama

Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे सोमवारी (ता.१५) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांची उदघाटने, भुमीपूजने केली. यावेळी त्यांनी शहरी पिण्याच्या आणि ग्रामीण पाणी (सिंचनाच्या) भांडणावर उतारा सांगितला. (Fadnavis made 'this' solution on Pimpri-Chinchwad water)

महापालिकांनी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी हे उद्योग तथा एमआयडीसींना देणार असून त्यांना देण्यात येणारे सिंचनाचे पाणी थांबविणार आहे.त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील पाणी भांडण मिटेल,असे फडणवीस यावेळी म्हणाले.सध्या पिंपरी-चिंचवडला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. म्हणून खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणातून २६ किलोमीटर जलवाहिनी टाकून १६७ एमएलडी पाणी पिंपरीत आणले जाणार आहे.त्यासाठी जमिन अधिग्रहण हा कळीचा मुद्दा आहे. (Devendra Fadanvis news)

Devendra Fadanvis on PCMC:
Rahul Narvekar Returned To Mumbai :…तर अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब होईल; विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितले

ती एका महिन्यात अधिग्रहीत करून पिंपरी महापालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश त्यांनी यावेळी व्यासपीठावरील पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिला.साडेबारा टक्यासह शहराचे इतर प्रलंबित प्रश्न सरकार वेगाने मार्गी लावणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.पिंपरी-चिंचवडला सेफ सिटी करण्याकरिता शहर पोलिस दलाचे बळकटीकरण करू,असे ते म्हणाले. (PCMC Politics)

दोन तास उशीरा सुरु झालेला हा सोहळा आज उदघाटन झालेल्या ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात झाला.हा धागा पकडीत `गदिमा `यांचे नाव नाट्य़गृहाला दिल्याने पिंपरी-चिंचवडची उंची वाढली,असे गौरवौद्गार फडणवीसांनी काढले. आधुनिक वाल्मिकी असलेले गदिमा हे साहित्य जत्रेतील अविस्मरणीय स्वप्न आहे,असे ते म्हणाले.पिंपरी-चिंचवड हे शहर आहे आणि गावही आहे.त्याच्याकडून भविष्याला आणि भविष्यात अपेक्षा आहेत,या शब्दांत त्यांनी शहराचे कौतूक केले.यावेळी त्यांनी यावर्षी ३ जानेवारीला निधन झालेले शहरातील चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची आवर्जून आठवण काढली. ( Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com