फडणवीस भुजबळांना म्हणाले; तुमच्यापेक्षा चारपट पुरावे माझ्याकडे आहेत

तुमची करणी एक आणि कथणी एक अशी स्थिती असल्याचे भुजबळ यांनी म्हणताच भाजपाच्या सदस्यांनी घोषणाबाची करण्यास सुरवात केली.
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

सरकारनामा

पुणे : ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) तुम्ही राजकारण करू नका.पुरावेच द्यायचे झाले तर तुमच्यापेक्षा चारपट पुरावे माझ्याकडे आहेत,असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना दिले.विधीमंडळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळ आणि फडणवीस यांची सविस्तर भाषणे झाली.यावेळी दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले.

<div class="paragraphs"><p>देवेंद्र फडणवीस</p></div>
पुण्यातील गणेश मंडळे म्हणतात...मेट्रोच्या पुलाला आमचा विरोध नव्हताच...!

विधीमंडळात ओबीसी आरक्षणाच्या विषयावर बोलायला भुजबळ उभे राहिले.ओबीसी आरक्षणाच्या विषयात झालेल्या याचिकेचा संदर्भ देण्याच्या तयारीत असताना भुजबळ यांना मध्येच थांबवत फडणवीस यांनी उत्तर दिले.ओबीसीचे आरक्षण ज्या याचिकेमुळे रद्द झाले ती मूळ याचिका करणारे कॉंग्रेसच्या आमदारांचे भाऊ व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत.मी कुणाचे नाव घेणार नाही. कारण हे सारे लोक ओबीसी आरक्षणाविरोधातील आहेत.भुजबळ यांना उद्देशून फडणीस म्हणाले, ज्या विकास गवळी यांचे नाव घेण्याचा प्रयत्न करून तुम्ही राजकारण करू पाहताय ते विकास गवळी भारतीय जनता पार्टीशी संबंधित नाहीत.त्यांचा भाजपाशी कसलाही संबंध नाही.ते वकील आहेत. या विषयात नाव घेतल्याप्रकरणी भाजपाच्या विकास गवळी यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे.त्यांनी योग्य तो खुलासा केला आहे.त्यामुळे या विषयात राजकारण करण्यापेक्षा ओबीसींचे आरक्षण कसे मिळेल यावर काम केले पाहिजे.’’

<div class="paragraphs"><p>देवेंद्र फडणवीस</p></div>
विखे-पाटील सकारात्मक बोलले; पण थोरातांना कळलेच नाही

फडणवीस म्हणाले, ‘‘ या विषयात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत.मात्र, यात आम्हाला राजकारण करायचे नाही.ओबीसींना आरक्षण कायमचे कसे मिळेल यावर विचार करण्याची गरज आहे.त्यासाठी जे काय करायचे ते आपण करू.पुढच्या दोन महिन्यात एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम आपण पूर्ण करू शकतो. एकदा हा डाटा गोळा झाला तर कुणाकडेही न जाता न्यायालयातून आपणास ओबीसी आरक्षण मिळू शकेल.’’

भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील नेते केंद्र सरकारकडे गेले. तुम्हीही केंद्रांकडे जा.इतर राज्यातील नेते आरक्षणाच्या विषयात केंद्राकडे जातात. तुम्ही का जात नाही, असा प्रश्‍न करून तुमची करणी एक आणि कथणी एक अशी स्थिती असल्याचे भुजबळ यांनी म्हणताच भाजपाच्या सदस्यांनी घोषणाबाची करण्यास सुरवात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com