MPSC News : बनावट दिव्यांग सर्टिफिकेटच्या आधारे सरकारी नोकरी मिळवलेल्या 250 जणांची यादी तयार

Fake certificate scam in MPSC after UPSC : सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. तर बनावट दिव्यांग सर्टिफिकेटच्या आधारे सरकारी सेवेत काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे आता समोर येऊ लागली आहेत.
MPSC
MPSCSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 August : सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. तर बनावट दिव्यांग सर्टिफिकेटच्या आधारे सरकारी सेवेत काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची नावे आता समोर येऊ लागली आहेत.

यूपीएससी पाठोपाठ 'एमपीएससी'मध्ये देखील अशाच पद्धतीने काही उमेदवारांनी दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचे आरोप केले जात आहेत. एका विद्यार्थी संघटनेने याबाबत एक सर्व्हे केला असून 250 जणांची यादी तयार केली आहे.

ही यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे दिली जाणार आहे. या यादीत नावे असलेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे. या यादीत MPSC मार्फत परीक्षा देऊन सरकारी कार्यालयांमध्ये रुजू झालेले उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपशिक्षण अधिकारी यांच्यासह अन्य महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला जात आहे.

MPSC
Pooja Khedkar : LBSNAA कोर्समध्ये वादग्रस्त पूजा खेडकरला मिळाले होते 5 मेमो

एमपीएससीने (MPSC) तसेच राज्य सरकारने या यादीची शहानिशा करत त्याची तपासणी केल्यास वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याप्रमाणे राज्यातील किती उमेदवार समोर येणार, याकडे आता लक्ष लागले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केलेले विविध कारनामे समोर आले आहेत. देशात सर्वात विश्वासू असलेल्या यूपीएससी परीक्षेत अशा पद्धतीने गोंधळ कसा होऊ शकतो? असा प्रश्न परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पडला आहे.

राज्यात देखील एमपीएससीची परीक्षा देताना अनेक उमेदवारांनी खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करुन सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबतची प्रकरणं आता बाहेर येऊ लागली आहेत. नगर जिल्ह्यात तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी तसेच काही शिक्षकांनी देखील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचे समोर आले आहे. त्यांची चौकशी आता केली जात आहे.

MPSC
Swapnil Kusale : कोल्हापूरच्या पठ्ठ्याची ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी! मुख्यमंत्र्यांची शाबासकी अन् सतेज पाटलांकडून मोठं बक्षीस

दिव्यांग नसताना अनेकांनी MPSC च्या दिव्यांग या आरक्षण कोट्यातून अर्ज करुन परीक्षा दिली आहे. त्याच्या आधारे त्यांनी सरकारी नोकरी मिळविली आहे. राज्यात 250 विद्यार्थ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन ही परीक्षा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवून देखील सहजपणे सरकारी नोकरी मिळते. त्याचाच फायदा उमेदवारांकडून घेतला जात असल्याचा आरोप होत आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या 'स्टुडन्ट राईट असोसिएशन' या संघटनेने ही यादी तयार केली आहे.

ही यादी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, एमपीएससी, दिव्यांग सचिवालय, मुख्य सचिव, दिव्यांग सचिवालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडे दिली जाणार आहे. या यादीची शहानिशा करून त्यामध्ये आक्षेप घेतलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यास प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर सारखी अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. या संशयित उमेदवारांची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील 'स्टुडन्ट राईट असोसिएशन' संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com