Pooja Khedkar : LBSNAA कोर्समध्ये वादग्रस्त पूजा खेडकरला मिळाले होते 5 मेमो

Controversial Pooja Khedkar received 5 memos in LBSNAA course : शिस्त आणि नियमांचे पालन करण्यामध्ये पूजा हिला अत्यंत कमी गुण मिळाल्याचे देखील समोर आले आहे.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची निवड तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय यूपीएससी ने घेतला आहे. 'आयएएस' म्हणून निवड झाल्यानंतर मसुरीतील 'लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन' (LBSNAA) ने घेतलेल्या फाउंडेशन कोर्स काळात पूजा खेडकर हिला 5 वेळा मेमो देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर शिस्त आणि नियमांचे पालन करण्यामध्ये पूजा हिला अत्यंत कमी गुण मिळाल्याचे देखील समोर आले आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी 'आयएएस' म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) हिचे अनेक कारनामे समोर आले आहे. आपल्या खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून खेडकर बिनधास्तपणे फिरत होती. आपल्याला बसण्यासाठी स्वतंत्र केबिन पाहिजे तसेच आपल्या दिमतीला कर्मचारी हवेत, अशा अवास्तव मागण्या त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर सुरू केल्या होत्या. त्यांचे वडील दिलीप खेडकर देखील जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांना दमदाटी करत असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. तिच्या नियुक्तीवर देखील अनेक आक्षेप आले होते.

Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्राची अंतिम नोटीस

पूजा खेडकर हिच्यावर झालेल्या आरोपांची दखल घेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. तिने 'यूपीएससी'कडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्याने यावर खुलासा करण्यासाठी त्यांना यूपीएससीने संधी दिली होती. मात्र या कालावधीत त्यांनी आपली कोणतीही भूमिका न मांडल्याने यूपीएससीने (UPSC) तिची निवड तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय बुधवारी घेतला आहे. तसेच तिला पुढील काळात आयोगाच्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही बंदी घातली आहे.

नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजा खेडकर दोशी आढळल्याचे यूपीएससीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. खोटी कागदपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी खेडकर यांनी पतियाळा हाऊस उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. याचा निकाल आज (गुरुवारी) चार वाजता निकाल दिला जाणार आहे.

Pooja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार; दिव्यांग प्रमाणपत्राचा अहवाल आयुक्तांकडे सादर

मसूरी येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन (Lal Bahadur Shastri National Academy Of Administration) ने घेतलेल्या फाउंडेशन कोर्स च्या काळात देखील पूजा खेडकर यांची वागणूक चांगली नसल्याचे समोर आले आहे. या कोर्सच्या काळात खेडकरला पाच वेळा ' मेमो ' देण्यात आला होता. त्यातील तीन मेमो हे इतर कारणांसाठी देण्यात आले होते. या काळात शिस्त आणि नियमांचे पालन करण्याबाबत 15 गुण होते त्यापैकी पूजा खेडकर यांना केवळ 3.14 इतकेच गुण मिळाले होते. या एकूण प्रशिक्षण दरम्यान 200 गुणांपैकी त्यांना केवळ 105.13 इतकेच गुण मिळाले होते, अशी माहिती मसुरीच्या संस्थेने यूपीएससीला दिल्याचे देखील आता समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com