Fake IAS In Pune : वादग्रस्त पूजा खेडकरनंतर पुण्यात आता तोतया IAS चा धुमाकूळ उघड..

Money Extortion Case in Pune : आयएएस असल्याचे सांगून तोतया आएएस रेणुका करनुरे करत होती सावकारी व्यवसाय.
Renuka Karnure
Renuka KarnureSarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : वादग्रस्त IAS पूजा खेडकर Pooja Khedkar प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असताना आता IAS अधिकारी असल्याचे भासवून सावकारी करणाऱ्या महिलेला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दुप्पट पैसे घेतल्यानंतरही अधिकचे पैसे वसूल करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी या बनावट आयएएस अधिकारी असलेल्या महिलेने दिली होती.

आपल्या व्हाट्सअपच्या 'डीपी'ला आयएएस IAS व भारतीय राजमुद्रेचा फोटो ठेवून आयएएस अधिकारी असल्याचे इतरांना भासवून ही महिला सावकारी व्याजाचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.

रेणुका ईश्वर करनुरे Renuka Karnure (रा. सिद्धीविनायक सोसायटी, वडकी) असे या तोतया आयएएस बनलेल्या महिलेचे नाव आहे. लोणी काळभोर पोलिसांनी तिला अटक केली आहे. याबाबत घरगुती व्यवसाय करणाऱ्या एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

तक्रारदार महिला या घरगुती व्यवसाय करतात. त्या रेणुका करनुरे हिच्याकडे येत होत्या. करनुरे हिने आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. तक्रारदार यांना पैशाची काही गरज असल्याने त्यांनी रेणुकाकडून सुरुवातीला 60 हजार रुपये दरमहा 5 टक्के व्याजाने घेतले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी 2 लाख 68 हजार रुपये दरमहा दहा टक्के व्याजाने घेतलेले होते. त्यावर तक्रारदार यांनी आतापर्यंत एकूण 3 लाख 48 हजार 650 रुपये व्याज देखील दिले.

Renuka Karnure
Babajani Durrani On Sharad Pawar : शरद पवारांचा धाक बाबाजानी दुर्राणींना चांगलाच माहीत; घरवापसीनंतर इतिहासच सांगितला...

तक्रारदार महिलेने करनुरेला वेगवेगळ्या पद्धतीने 8 लाख 8 हजार रुपये दिलेले आहेत. असे असतानाही तिने अजून तुझ्याकडे 4 लाख 55 हजार रुपये देणे बाकी असल्याचे सांगितले. व्हॉटसअ‍ॅपवर वारंवार मेसेज करुन ती पैशांची मागणी करत होती.

आपले पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील ती देत होती. व्याजाचे पैसे वेळेवर दिले नाही तर प्रत्येक दिवशी ती 200 रुपये दंड घेत होती. दोन दिवसांपूर्वी तिने तक्रारदार यांच्या घरी जाऊन आपले पैसे देण्याची मागणी केली होती.

पैसे दिले नाही, तर मी आयएएस पदावर आहे, हे लक्षात ठेवा. मी पूर्ण सिस्टिम हालवू शकते. सगळ्यांना पैशांच्या जोरावर मॅनेज करेल. तुझा पती ट्रक ड्रायव्हर आहे. त्याचा अ‍ॅक्सिडेंट करुन त्यांना कायमचे संपवून टाकेल, अशी धमकी दिली. त्यामुळे तक्रारदार महिलेने घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली.

यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी Pune Police याची दाखल घेत तातडीने गुन्हा दाखल केला. त्यानंतर रेणुका करनुरे हिला अटक करुन तिचा भंडाफोड केला. तिने आणखी कोणाला व्याजाने पैसे दिले आहेत का याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके करत आहेत.

(Edited Sunil Dhumal)

Renuka Karnure
Smita Sawant-Mandre : 'कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून संधी द्या' ; स्मिता सावंत-मांडरेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com