Kolhapur Shivsena Thackeray Group and Vidhan Sabha Election : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याबाबत शाश्वती नाही. पण प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आघाडी होईल न होईल, असे गृहीत धरून तयारी सुरु केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मोठी रस्सीखेच होणार आहे.
शिवसेना(Shivsena) ठाकरे गटातच आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पक्षातून ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार हे कोल्हापूर उत्तर मधून लढवण्यास तयार असताना ठाकरे गटाच्याच एका वाघीनीने कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ठाकरे यांच्याकडे पत्र देऊन ही मागणी केली असून उपजिल्हाप्रमुख महिला संघटिका स्मिता सावंत-मांडरे(Smita Sawant-Mandre) यांनी या जागेवर दावा केला आहे. सावंत या गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत(ठाकरे गट) कार्यरत आहेत. कोल्हापूर शहरात शिवसेनेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्याचा सहभाग आहे. प्रत्येक आंदोलनात सावंत यांचा सहभाग असून त्यांनी कोल्हापूर शहरासह परिसरात सामाजिक उपक्रम घेत शिवसेना घराघरात पोहचविण्याचे कामं केले आहे. हाच धागा पकडत त्यांनी कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
''पक्षप्रमूख मा. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे साहेब(Uddhav Thackeray), मी गेले आठ वर्षे पक्षाच्या महिला आघाडीचे कोल्हापूर काम सांभाळत असून माझ्या माध्यमातून पक्षातील मतदार वाढीसाठी, शिवसेना महिला शाखा विस्तारीकरण, महिला शिवसेना प्रवेश व अशा प्रकारचे लोकहितासाठीचे अनेक उपक्रम शिवसेना पक्षाच्या वतीने करीत आहे. बरीच आंदोलने महिलांच्या हितासाठी व महिलांना रोजगार मिळण्यासाठी बरेच उपक्रमही घेत आहे.''
तसेच ''स्मिता फाउंडेशन, कोल्हापूर व इनरव्हील क्लब, कोल्हापूर व रोटरी क्लब, कोल्हापूरच्या माध्यमातून सामाजिक एनजीओंच्या माध्यमातून बरीच उदाहरणार्थ महानगरपालिकेच्या शाळा दतक घेणे, गरजू महिलांसाठी शिलाई मशीन देणे, मोफत वैद्यकीय शिबिर राबवणे, गरीब मुलांचे शिक्षणासाठी साहित्य, गरजोपयोगी वस्तू व बन्याच गोष्टी घेणे अशी कामगिरी करीत आहे.''
''कोल्हापुरात उत्तर मतदारसंघात बराच जनसंपर्क देखील वाढवला आहे. लोकांच्या इच्छेसाठी देखील मला काम करायचं आहे. मी व माझ्या महिला आघाडी कायम उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे साथ द्यायला कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्यावतीने उमेदवार म्हणून मला संधी द्यावी ही नम्र विनंती.''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.