उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकरी करणार आंदोलन

उजनी धरणातून पाच टीएमसी सांडपाणी देण्यास सोलापूरकरांनी विरोध केला आहे.
datta bharane.jpg
datta bharane.jpg
Published on
Updated on

वालचंदनगर : उजनी धरणातून पाच टीएमसी सांडपाणी देण्यास सोलापूरकरांनी विरोध केला आहे. सोलापूरकरांना विरोध करुन इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी एकवटे असून शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीने माध्यामातून लढा देण्याचा निर्धार केला आहे.Farmers will agitate in Indapur for Ujani water 

पुणे व पिंपरी शहरातून उजनी धरणात वाहून येणाऱ्या सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वापरण्याच्या योजनेला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे २२ एप्रिल २०२१ रोजी तत्वत: मान्यता मिळाली. सदरच्या योजनेला सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांनी व पुढाऱ्यांनी विरोध करुन पाण्याचे राजकारण सुरु केले.राज्यमंत्री भरणे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये आंदोलने सुरु झाली. सोलापूरकरांच्या विरोधामुळे इंदापूर तालुक्याला हक्काचे पाणी मिळते की नाही अशी परस्थिती निर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी व सोलापूरकरांना विरोध करण्यासाठी व जशास तसे उत्तर देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय शेतकरी एकवटले आहेत.

यासंदर्भात बैठक लाखेवाडी येथे नुकतीच पार पडली यावेळी शेतकरी कृती समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती प्रशांत पाटील, बाळासाहेब करगळ, बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे, दत्तात्रेय घोगरे,नवनाथ रुपनवर, नंदू पोळ, शहाजी पाटील,अजित टिळेकर यांच्यासह तालुकाभरातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जनआंदोलन उभारण्याचा निर्णय...
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील २२ गावासह इतर गावातील शेतकऱ्यांना उजनीचे पाणी मिळणार आहे.यामध्ये सोलापूरच्या हक्काचे एक ही थेंब पाणी घेण्यात येणार नाही. पाणी मिळण्यासाठी २२ गावातील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या आंदोलन करीत असून तिसरी पिढी ही आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. आत्ता नाही तर केव्हाच नाही अशी परस्थिती निर्माण झाली असून उजनीच्या पाण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी एकमताने लढा देणार असल्याचे शेतकरी कृती समिती सदस्य व २२ गावातील पाण्याप्रश्‍न हातळाणारे निमसाखरचे माजी उपसरपंच नंदकुमार रणवरे यांनी सांगितले

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com