MPSC News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) काही दिवसांपूर्वी काढलेल्या माहिती व जनसंपर्क विभागांच्या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रतेच्या नियमावलीमुळे ‘पदव्युत्तर पदवी’ धारक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
आयोगाच्या या नियमावलीनुसार पत्रकारितेमध्ये पदवी किंवा पदविका अर्थात बॅचलर डिग्री किंवा डिप्लोमा केलेले विद्यार्थी पात्र होते. मात्र, पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी (MA In Journalism and Mass Communication) घेतलेले उमेदवार अपात्र ठरत होते. त्यामुळे राज्यातील लाखो पत्रकारितेच्या ‘पदव्युत्तर पदवी’ धारक विद्यार्थ्यांना फटका बसत होता.
आता आयोगाने (MPSC) उशिरा का होईना पण याबाबत निर्णय बदलत पत्रकारितेच्या सर्व पदव्युत्तर पदवीधारकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी व माहिती अधिकारी या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनी संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर या जाहिरातीमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनी संधी देण्याची मागणी करूनही संधी न देण्याची ताठर भूमिका एमपीएससीने घेतली होती.
त्यानंतर याबाबत राज्यात सर्वत्र चर्चा झाली. तसेच माध्यमांमध्येही बातम्या आल्या. त्यानंतर अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लवचिक भूमिका घेत आपला निर्णय बदलला आहे. आज 'एमपीएससी'ने पत्रकारितेच्या सर्व पदव्युत्तर पदवीधारकांना संधी देण्याचा निर्णय घेतला. तसेच परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीतही वाढ करत २५ एप्रिल ऐवजी ८ मे पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
(Ediited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.