कात्रजचे दूध तपासणी करणारे पाच केमिस्ट निलंबित..अन्य चार जणांची तत्काळ उचलबांगडी

Crime : एका कंत्राटी सेवकाबद्दल संशय आल्याने बिंग फुटले...
Katraj Crime Latest News
Katraj Crime Latest Newssarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेतील दूध फॅट फेरफारी प्रकरणात पाच अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात मदत केल्याच्या कारणाने अन्य चार जणांची देखील उचलबांगडी केल्याची माहिती अध्यक्षा केशर सदाशिव पवार व कार्यकारी अधिकारी संजय कालेकर यांनी दिली.

दरम्यान, एवढ्या मोठ्या कारवाईचे हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रवादी पक्षपातळीवरही गांभिर्याने घेतल्याने जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर अध्यक्ष-उपाध्यक्षांसह पक्षाच्या सर्व संचालकांशी चर्चा केली असून वरील निर्णय विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना अवगत करणार असल्याचेही केशर पवार यांनी सांगितले. (Katraj Crime Latest News)

Katraj Crime Latest News
पप्पू कभी फेल नही होगा...

कात्रज (पुणे) दुग्धालयात ९ तारखेला आलेल्या एका दूध टॅंकरमधील दुधाचे नमूने तपासणीसाठी घेताना एका कंत्राटी सेवकाबद्दल संशय आल्याने सदर टॅंकरमधील दुधाची फेरतपासणी करण्यात आली होती व सदर सेवकाला तात्काळ कामावरुन कमी करण्यात आले होते.मात्र या प्रकरणात तथाकथीत सहभाग असल्याच्या संशयावरुन कात्रज प्लॅंट दुध संकलन प्रमुखासह पाईट प्लॅंट प्रमुख, काही केमीस्ट व अधिकारी-कर्मचारी अशा एकुण नऊ जणांची चौकशी सुरू करुन प्रत्येकाकडून खुलासेही मागविण्यात आले होते.

सदर सर्व खुलासे व चौकशी अहवाल काल बुधवार (ता.२३ नोव्हेंबर) रोजीच्या संचालक मंडळ बैठकीत ठेवण्यात आला. बैठकीतील निर्णयानुसार प्रथमदर्शनी दोषी असलेल्या कात्रज प्लॅंट दूध संकलन प्रमुख,पाईट (ता.खेड) प्लॅंट प्रमुख, पाईट येथील एक केमिस्ट, कात्रज येथील दोन केमिस्ट अशा एकुण पाच जणांचे तात्काळ निलंबन करण्यात येवून त्यांचे जागी नवीन अधिकारी कर्मचारी नियुक्त केल्याची कार्यवाही कालचे कालच केल्याची माहिती पवार यांनी दिली.

Katraj Crime Latest News
सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, 2 लाखांची मागितली लाच

दरम्यान, कात्रज संघ हा राष्ट्रवादीची सत्ता असल्याने संस्था कारभाराची पूर्ण माहिती वरिष्ठ नेत्यांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांचेपर्यंत असावी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनाही कळविले असून ते स्वत:काल कात्रजच्या सर्व संचालकांसोबतही बोलले असल्याचेही पवार यांनी सांगितले.

कात्रज संघाच्या इतिहासात पहिली महिला अध्यक्ष म्हणून मला अजितदादा यांनी संधी दिल्याने संघाचा कारभार मी पारदर्शक ठेवण्याचा माझा इरादा नियुक्तीवेळीच ठरविला आहे.त्यामुळे कात्रजच्या कारभाराबद्दल एकाच वेळी नऊ जणांवर कारवाई करताना मी कचरलेले नाही ना भविष्यातही कचरेन. शिवाय चालू असलेल्या चौकशीनंतर कुणीही दोषी आढळल्यास कडक कारवाईही आपण करणार असल्याचे केशर पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com