सहाय्यक पोलिस निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात, 2 लाखांची मागितली लाच

कोंढवा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
ACB Action
ACB ActionSarkarnama
Published on
Updated on

पुणे : कोंढवा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. काही दिवसांमध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात एसीबीची झालेली ही दुसरी कारवाई आहे. जागेसंबंधीच्या वादामध्ये सहकार्य करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. (Bribe Case News)

याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकार्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वराज पाटील असे संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. काही दिवसांमध्ये कोंढवा पोलीस ठाण्यात एसीबीची झालेली ही दुसरी कारवाई आहे.

ACB Action
Yuvasena : राज्यपालांच्या बुद्धीत सुधारणा व्हावी म्हणून चक्क पोस्टाने बदाम पाठवले..

स्वराज पाटील असे संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय तक्रारदाराच्या पत्नी व सासऱ्यांविरुद्ध जागेच्या वादासंबंधी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली होती. संबंधित तक्रार अर्जावरुन कारवाई न करता, तक्रारदारास योग्य ते सहकार्य करण्यासाठी स्वराज पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती.

ACB Action
Udayanraje Bhosale : कोश्यारी, त्रिवेंदींना लाज वाटत नाही का ? ; उदयनराजे भडकले

याप्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपतकडे तात्काळ तक्रार अर्ज दाखल केला. या अर्जानंतर एसीबीच्या पथकाने जून महिन्यात पडताळणी केली त्यामध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com