Flag Hoisting Program : ना अजितदादांची...ना चंद्रकांतदादांची.... पुण्यात दादागिरी राज्यपालांची...

Pune News : आता दोन जिल्ह्यांतील ध्वजवंदन कार्यक्रमात बदल करण्यात आलेला आहे.
Chandrakant Patil-Ramesh Bais-Ajit pawar
Chandrakant Patil-Ramesh Bais-Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : पालकमंत्रिपदानंतर राज्यात ध्वजवंदन कार्यक्रमावरूनही रुसवे फुगवे सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातून आपलेच निर्णय अवघ्या २४ तासांच्या आत फिरविण्याची नामुष्की सरकारवर येत आहे. दोन जिल्ह्यांतील ध्वजवंदन कार्यक्रमात बदल झाला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दोन्ही ध्वजवंदन करणार नाहीत. चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता राज्यपाल रमेश बैस हे ध्वजवंदन करणार आहेत. (Flag hoisting will be done by Governor Ramesh Bais in Pune)

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली. मंत्रिपदाचे वाटप झाले, मात्र अजूनही पालकमंत्रिपदाचे वाटप होऊ शकलेले नाही. स्वातंत्र्यदिन तोंडावर आल्याने सरकारने गुरुवारी (ता. १० ऑगस्ट) स्वातंत्रदिनाच्या ध्वजवंदनाच्या जबाबदीचे वाटप केले होते. मात्र, अवघ्या चोवीस तासांच्या आतमध्ये राज्य सरकारकडून त्यात बदल करण्यात आलेला आहे.

Chandrakant Patil-Ramesh Bais-Ajit pawar
Shinde Group In Trouble: भाजपच्या नव्या भूमिकेमुळे शिंदे गटाला फुटला घाम; लोकसभा कमळ चिन्हावर लढविण्याचा आग्रह

आता दोन जिल्ह्यांतील ध्वजवंदन कार्यक्रमात बदल करण्यात आलेला आहे. पुणे येथे आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी राज्यपाल रमेश बैस हे ध्वजवंदन करणार आहेत. रायगड येथे जिल्हाधिकाऱ्यांऐवजी आता चंद्रकांत पाटील हे ध्वजवंदन करणार आहेत. त्यामुळे ना अजितदादांची ना चंद्रकांतदादांची.... पुण्यात दादागिरी राज्यपालांची असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पालकमंत्रीपदाची तिढा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याची जबाबदारी कायम आहे. तसेच, अजित पवार हे पुण्यासाठी आग्रही राहणे सहाजिक आहे. पण, इतर ठिकाणच्या पालकमंत्रीपदावरूनही सध्या महायुतीमध्ये एकमत होऊ शकलेले नाही, त्यामुळे स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदन करण्याची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. आता त्यातही बदल झालेला आहे.

Chandrakant Patil-Ramesh Bais-Ajit pawar
Nilesh Rane News: निलेश राणेंचा ठाकरेंना मोठा दणका; कोकणातले चार डझन शिलेदार फोडले, वैभव नाईकांना धक्का !

कोण कुठे करणार होते ध्वजवंदन?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - मुंबई, देवेंद्र फडणवीस - नागपूर, अजित पवार- कोल्हापूर, छगन भुजबळ - अमरावती, सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर, चंद्रकांत पाटील- पुणे, दिलीपराव वळसे पाटील- वाशिम, राधाकृष्ण विखे पाटील - अहमदनगर, गिरीश महाजन- नाशिक, दादा भुसे - धुळे, गुलाबराव पाटील-जळगाव, रवींद्र चव्हाण- ठाणे, हसन मुश्रीफ - सोलापूर, संजय बनसोडे - लातूर, धर्मराज आत्राम - गडचिरोली, संजय राठोड- यवतमाळ, धनंजय मुंडे - बीड, पालघर - आदिती तटकरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com