Tushar Kamthe : 'सरकारनामा'चे वृत्त खरे ठरले ; भाजप सोडलेले माजी नगरसेवक कामठे राष्ट्रवादीत

Tushar Kamthe : कामठे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज होते.
Ajit Pawar,Tushar Kamthe
Ajit Pawar,Tushar Kamthe Sarkarnama
Published on
Updated on

Tushar Kamthe : गेल्यावर्षी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये जोरात सुरु झालेले `इनकमिंग`, व `आऊटगोईंग` नंतर ही निवडणूक लांबल्याने थांबले होते.चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडकीत ते पुन्हा सुरु झाले आहे.

बुधवारी (ता.१५) भाजप सोडलेले चिंचवड मधील माजी नगरसेवक तुषार कामठे (Tushar Kamthe) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आज सायंकाळी प्रवेश करणार आहेत.

वर्षभरापूर्वीच नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेल्या कामठेंनी तीन दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा चिंचवडचा प्रचार ऐन रंगात आला असताना दिल्याने भाजपला धक्का बसला होता.तर,आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने या पक्षाची बाजू या निवडणुकीत काहीशी मजबूत झाली आहे.

त्यांनी राजीनामा दिलेल्या दिवशीच `सरकारनामा`नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली होती. ती तंतोतंत खरी ठरते आहे.

गुरुवारी (ता.१६) राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी भाजपमध्ये या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता.त्याची परतफेड कामठेंच्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतील आजच्या प्रवेशाने ४८ तासांतच होणार आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे हे दोन्ही प्रवेश हे चिंचवडच्या प्रचाराच्या रणधुमाळीतच झाले वा होत आहेत.

या मतदारसंघातील भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी बावनकुळे आले असताना ओव्हाळांचा प्रवेश झाला.तर, या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या अजितादांच्या उपस्थितीत कामठेंचा प्रवेश पिंपळे निलख येथील प्रचार सभेत आज होणार आहे.

Ajit Pawar,Tushar Kamthe
Jitendra Awhad : आव्हाडांनी शेअर केली "एका बाबाची गोष्ट.." ; पिता म्हणून हे सगळं सहन करायचं ?

२०१७ ला पिंपळे निलखमधून (प्रभाग क्र.२६) निवडून आलेले कामठे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज होते.त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत साथ दिल्याने कामठेंनी प्रथम नगरसेवकपदाचा राजीनामा वर्षापूर्वी दिला.पक्षाचे स्थानिक नेते हे ठेकेदार असून त्यांच्या भ्रष्टाचाराला,हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते,तर,यावर्षी त्यांनी थेट पक्षालाच रामराम केला.

आता राष्ट्रवादीतील प्रवेशाचे आमंत्रण आपल्या प्रभागातील मतदारांना देताना त्यांनी आर्त साद घातली आहे. आतापर्यंत तुम्ही जशी खंबीर साथ दिलीत,तशीच पुढील वाटचालीतही द्याल,अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे.तुमच्या विश्वासाला कुठलाही तडा जाणार नाही,याची ग्वाही देतो,असे सांगत त्यांनी पक्ष प्रवेशाला हजर राहण्याची विनंती पिंपळे निलखकरांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com