दोन्ही काँग्रेसने उमेदवारीत डावलेले माजी सभापती बनले बैल! : गावातून मिरवणूक काढून व्यक्त केली नाराजी

ते पुरंदर तालुक्यातील मांडकी-जवळार्जून गटातून निवडणूक लढविण्यास इच्छूक होते.
Nandkumar Jagtap
Nandkumar JagtapSarkarnama
Published on
Updated on

सासवड शहर (जि. पुणे) : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालक होण्यासाठी अनेकजण इच्छूक होते. पण, जागा एकवीसच असल्याने सर्व इच्छुकांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनेलमध्ये संधी मिळू शकली नाही. त्यातून अनेकजण नाराज झाले असून ते आपापल्या परीने नाराजी दर्शवित आहेत. मात्र, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार मल्हारी जगताप यांनी अनोख्या पद्धतीने नाराजी व्यक्त केली आहे. (Former chairman Nandkumar Jagtap is upset over not getting candidature for Someshwar Sugar Factory election)

भाद्रपदी पोळ्याच्या दिवशी बैलाची मिरवणूक काढण्यात येते. त्याप्रमाणे काल (ता. ६ आक्टोबर) बैलांची मिरवणूक काढताना नंदकुमार जगताप हे स्वतः बैल झाले, गळ्यात हार घातला आणि स्वतः एका बैलाच्या बरोबरीने गावात चालत मिरवणुकीत सहभागी होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी कारखान्यासाठी राष्ट्रवादीबरोबर युती केली आहे.

Nandkumar Jagtap
‘छत्रपती’चे त्यावेळचे संचालक घरून दशम्या आणायचे आणि एकत्र बसून जेवायचे!

नंदकुमार जगताप यांनी नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. ते कारखान्याच्या सर्वसाधारण प्रवर्गातून पुरंदर तालुक्यातील मांडकी-जवळार्जून गटातून निवडणूक लढविण्यास इच्छूक होते. मात्र, राष्ट्रवादीकडून काँग्रेसला भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग ही आरक्षीत जागा मिळाली आहे. त्यामुळे जगताप यांना संधी मिळाली नाही.

Nandkumar Jagtap
अजित पवार यांच्यावर छापे : राजकीय `क्रोनोलाॅजी` समजून घ्या...

गेली वीस वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर आपण प्रामाणिकपणे काम करीत आहोत. मी मांडकी-जवळार्जून गटातून सोमेश्वर कारखान्यासाठी इच्छूक होतो. एवढी वर्षे पक्षाबरोबर राहून उमेदवारीत आपल्याला डावलण्यात आले. त्यामुळे आपल्याला मानहानीला सामोरे जावे लागले. भाद्रपदी बैल पोळ्याचा काल सण होतो. बैल वर्षभर आपल्या मालकाशी (शेतकऱ्याशी) प्रामाणिक असतो. त्याच बैलांची पोळ्याच्या दिवशी सजवून गावातून मिरवणूक काढण्यात येते. अगदी त्याच पद्धतीने मी दोन्ही काँग्रेसशी प्रामाणिक असतानाही उमेदवारीत डावलल्याने माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे माझ्या एका बैलाबरोबर मी स्वतः बैल बनून मिरवणुकीत सहभाग नोंदवत नाराजी व्यक्त केली, असे नंदकुमार जगताप यांनी सांगितले.

नंदकुमार जगताप हे आमदार संजय जगताप यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी सध्या सासवड नगरपालिकेत काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. कारखान्याच्या उमेदवारीबाबत ते म्हणाले की, उमेदवारी न मिळाल्याने मी नाराज जरी असलो तर निवडणुकीत आघाडीचेच काम करणार आहे. नुकतेच झालेल्या प्रचाराच्या शुभारंभाच्या अजित पवार यांच्या सभेला मी गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com