EX Mayor Mohan Singh Rajpal News : शरद पवारांचा विश्वासू शिलेदार हरपला; माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचं निधन

Mohan Singh Rajpal The First Mayor Of the Sikh community : शीख समाजातील पहिले महापौर असलेल्या मोहनसिंग राजपाल यांची 'बाबुजी' म्हणून होती संपूर्ण शहरात ओळख..
Mohansing Rajpal
Mohansing RajpalSarkarnama

Pune News : पुणे शहराचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे शनिवारी(ता.27) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे शहारातील शीख समाजाचे ते पहिले महापौर होते. पुणे महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना 2009 ते 2012 या अडीच वर्षांसाठी राजपाल यांनी महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ते नगरसेवक होते. पक्षाने त्यांना महापौरपदावर काम करण्याची संधी दिली होती. 'बाबुजी' म्हणून त्यांची ओळख होती. शहराचा मध्यवर्ती पेठांचा भाग अशी ओळख असलेल्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1996-97 वर्षांनंतर 2009 मध्ये महापालिकेचे पुरुष महापौर म्हणून काम करणारे राजपाल हे दुसरे महापौर ठरले होते.

1999-2002 या काळात दत्तात्रय गायकवाड हे पुरुष महापौर होते. मात्र, त्या अगोदर एक टर्म आणि नंतरची पाच वर्षे पुणे महानगरपालिकेचे महापौरपद हे महिला खुला तसेच अनुसूचित जाती जमातीच्या महिलांसाठी राखीव होते. त्यामुळे महापौरपदी विराजमान झाल्यानंतर राजपाल यांची जोरदार चर्चा संपूर्ण पुणे शहरात झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mohansing Rajpal
Poonam Mahajan News: ...म्हणून दहा वर्ष खासदार राहिलेल्या पूनम महाजनांचा 'मुंबई उत्तर-मध्य'मधून पत्ता कट झाला!

या काळात महानगरपालिकेत (PMC) काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असल्याने महापौरपद राष्ट्रवादीकडे तर उपमहापौरपद काँग्रेसकडे होते. काँग्रेसने उपमहापौर म्हणून त्यावेळी प्रसन्न जगताप यांना संधी दिली होती. महापौरपदासाठी राजपाल यांचे नाव सुरुवातीपासून कधीही चर्चेत नव्हते. मात्र, अखेरच्या क्षणी राजपाल यांच्या नावाला पसंती देत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना महापौरपदासाठी संधी दिली होती.

चार वर्षांपूर्वी 2020 मध्ये त्यांच्या पत्नी जसबीरकौर राजपाल यांचे निधन झाले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून मोहनसिंग राजपालदेखील आजारी होते. एका खासगी हॉस्पिटलमध्ये शनिवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महापौरपद अन् वादग्रस्त निर्णय आणि वक्तव्य

पुणे शहराचे महापौर म्हणून काम करताना बिनधास्त आणि स्पष्ट वक्तव्ये करणारे महापौर म्हणून मोहनसिंग राजपाल यांची ख्याती होती. लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्याचा वादग्रस्त निर्णय महापौर असताना राजपाल यांच्या काळात झाला होता. त्याचे जोरदार पडसाद त्यानंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यावेळी थेट पोलिसांना पालिकेच्या जीबीमध्ये पाचारण करावे लागले होते.

मोहनसिंग राजपाल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तसेच काही निर्णयांचे त्यांनी थेट समर्थन केल्याने त्यांच्यावर महापालिकेच्या आवारात शाईफेकदेखील करण्यात आली होती. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाची तारीखदेखील महापौर असताना मोहनसिंग राजपाल यांनी अनेकदा थेट जाहीर करून धमाल उडवून दिली होती.

यावरून त्यांच्यावर टीकादेखील झाली होती. मात्र, झालेली टीका कधीही त्यांनी मनाला लावून त्यांनी घेतली नाही. त्यांच्याविरोधात आंदोलन, टीका करणाऱ्यांशीदेखील ते आपुलकीने वागत त्यांची चौकशी करत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत होते.

R

Mohansing Rajpal
PM Narendra Modi : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात मोदींच्या चार दिवसांत नऊ सभा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com