PCMC News : महेश लांडगेंच्या स्वप्नाला भाजपच्याच माजी मंत्र्यांनी घातली वेसन ; पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम

Bala Bhegade News : पिंपरी-चिंचवडकरांना दुपारी मिळालेला दिलासा संध्याकाळी अल्पजीवी ठरला.
Bala Bhegade, Mahesh Landge News
Bala Bhegade, Mahesh Landge NewsSarkarnama

Pimpri-Chinchwad News : मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आणण्याच्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ड्रीम प्रोजेक्टवर २०११ ला त्यांच्याच राज्य सरकारने बंदी आणली. भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगेंच्या (Mahesh Landge) प्रयत्नामुळे नुकतीच ती बंदी उठल्याने तो पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, माजी राज्यमंत्री आणि मावळचे भाजपचेच माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhegade) यांनी या प्रकल्पाला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार 'सरकारनामा'शी बोलताना सोमवारी (ता.११) केला.

त्यामुळे या योजनेचे भवितव्य पुन्हा लटकले असून पिंपरी-चिंचवडकरांना दुपारी मिळालेला दिलासा संध्याकाळी अल्पजीवी ठरला. भेगडे व त्यांचा पक्ष भाजपसह (BJP) शिवसेना आणि आरपीआय या तीन राजकीय पक्षांसह भारतीय किसान संघाने बंदी उठली असली, तरी पुन्हा ही योजना सुरू करण्यास आज विरोध केला. त्यांच्या आंदोलनामुळेच या योजनेवर २०११ ला बंदी आली होती. दरम्यान, ती नुकतीच उठली. तरीही वरील पक्ष आणि संघटनेसह स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम राहिल्याने या प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे कायम राहिले आहेत.

Bala Bhegade, Mahesh Landge News
High Court News : घरात हनुमान चालिसा म्हटल्याने भावना कशा दुखावतील ? गुन्हा रद्द..

परिणामी पिंपरी-चिंचवडकरांना दररोज पाणी मिळण्याची आशा पुन्हा धूसर झाली आहे. ही योजना पूर्ण झाली असती, तर २०५० पर्यंत शहराचा पाणीप्रश्न मिटणार होता. पण, या योजनेला आपला शंभर टक्के विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार बाळा भेगडेंनी आज केला. तो कालही होता आणि आजही तसाच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०११ च्या आंदोलनातील तीन शेतकऱ्यांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे ते म्हणाले. त्यासाठी सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून ही योजना रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी महापालिका प्रशासकांकडून निर्णयाचे स्वागत

पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती सरकारने उठविल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नागरिकांसाठी ही आनंदाची बाब असून शहराची पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यास यामुळे मदत होईल, अशी प्रतिक्रिया दिली. झपाट्याने वाढणार्‍या शहरात स्वच्छ आणि सतत पाणी पुरवठा करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पवना बंद जलवाहिनी योजनेवरील स्थगिती १२ वर्षांनंतर उठली हे महापालिकेसाठी एक निर्णायक वळण आहे, असे ते म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Bala Bhegade, Mahesh Landge News
Bhandara News : आमदार भोंडेकरांची वाढली जबाबदारी ; जखमी गोंविदाना द्यावी लागणार शासकीय नौकरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com