Shivajirao Adhalrao Patil News : ''कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या (NCP) महाविकास आघाडी सरकारसाठी संपूर्ण शिवसेनेतून प्रचंड विरोधा होता. सर्व वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत वेळोवेळी सांगितले. मात्र, त्यांनी निर्णय घेतल्यानंतर जे व्हायचे तेच झाले. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होवून अन्याय होत राहिला. याच वेळी एक समजले, उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) पराभूत खासदार-आमदार म्हणजे अगदी झाडावरुन गळालेल्या पानांसारखे आणि पालापाचोळ्यासारखे आहेत,'' असा आरोप शिवसेना नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केला.
आढळराव पाटील यांनी 'सरकारनामा'ला मुलाखत दिली. त्यामुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. या मुलाखतीमध्ये आढळराव पाटील म्हणाले, ''शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतीतल्या सर्व भावनिक, राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक गोष्टींना व्यक्त होत सांगितले की, पूर्वी मी खासदार असताना संघटना पातळीवर उद्धव ठाकरे यांचा संवाद चांगला असे. ते वैयक्तिकही खुप चांगले संवाद ठेवत असत.''
''मात्र, २०१९ मध्ये माझ्या पराभवानंतरचे उद्धव ठाकरे खुपच वेगळे वाटले. त्यांच्या दृष्टीने पराभूत खासदार-आमदार म्हणजे अगदी पालापाचोळा व झाडाचे पिकून गळालेले पान, अशी त्यांची मानसिकता वाटली आणि मी अनुभवली. पर्यायाने या सर्वांची परिनिती एकनाथ शिंदेंचे बंड झाले. मोठ्या संख्येने जेष्ठ शिवसेना नेते शिंदेसोबत गेल्याचे मत माजी खासदार आढळराव पाटील यांनी मांडले.''
''एक मात्र, नक्की उद्धव ठाकरेंच्या वाईट अनुभवावेळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनुभव मात्र पहिल्यापासून आणि मी पराभूत झाल्यापासून तर खुपच हुरुप वाढविणारा होता. मी गेली १९ वर्षे पूर्वीच्या खेड व सध्याच्या शिरुर लोकसभा मतदार संघातील अनेक प्रश्न घेवून माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण अशा सर्वच मुख्यमंत्र्यांना बैठकीच्या निमित्ताने भेटलो चर्चा केल्या. मात्र, ठोस निर्णय, सकारात्मक प्रतिसाद आणि नकार न देण्याची वृत्ती ही फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कडे मला जास्त अनुभवायला आली.''
ग्रामीण आमदार खासदारांवर त्यांचा विश्वास कधीच नव्हता..!
''मुंबई-ठाण्याच्या शहरी आणि ठराविक पदाधिका-यांच्या सोबत शहरी राजकारण ही उद्धव ठाकरे यांनी पध्दत आहे. ठरावीक शहरी पदाधिका-यांवरच त्यांचा प्रचंड विश्वास आहे. ते ग्रामीण भागातील सर्वच खासदार-आमदारांवर कधीच पूर्ण विश्वास ठेवत नव्हते. ही मला नेहमीच खटकणारी बाब होती. अर्थात त्यांचेकडून आम्हाला न विचारता संपर्कप्रमुख वरुन लादले जाण्याचा प्रकार खुपच वाईट होता. त्यासाठी माझे त्यांचे वाद होत होते, हेही मी या निमित्ताने आवर्जून सांगतो,'' असे आढळराव पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.