आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षाला बेदम मारहाण

आळंदीतील कुऱ्हाडे आणि जगताप कुटुंबांत झालेल्या भांडणातून दोन्ही कुटुंबातील व्यक्तींसह सुमारे चाळीस जणांवर गुन्ह्यांची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.
crime
crimeSarkarnama
Published on
Updated on

आळंदी : जमिनीच्या ताब्यावरून झालेल्या भांडणात आळंदीचे (Alandi) माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून जिवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करण्यात आली. आळंदीतील कुऱ्हाडे आणि जगताप कुटुंबांत झालेल्या भांडणातून दोन्ही कुटुंबातील व्यक्ती, तृतीयपंथीसह आणि पंधरा ते वीस जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न, दरोडा आणि मारहाणीच्या गुन्ह्यांची (Crime) नोंद आळंदी पोलिस ठाण्यात (Police) झाली आहे. (Former President of Alandi Municipal Council beaten)

ही घटना चऱ्होली खुर्दमधे घडली. यामधे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, हेमंत उर्फ सागर कुऱ्हाडे, संदीप कुऱ्हाडे, संदेश कुऱ्हाडे, शोभा कुऱ्हाडे, लिलाबाई कुऱ्हाडे, रंजना कुऱ्हाडे, राम जगताप, सुनीता जगताप, प्रशांत जगताप, प्रसाद जगताप यांच्यासह तृतीयपंथी आणि पंधरा ते वीस जणांवर परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

crime
'याचा हिशोब भाजपला 2024 मध्ये द्यावा लागेल'; अब्दुल सत्तारांचा थेट इशारा

आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगताप कुटुंबीयांची २०१३ मध्ये कुऱ्हाडे कुटुंबीयांकडून चऱ्होली खुर्दमधील सुमारे पंचावण्ण गुंठे जागा साठेखत व कुलमुखत्यारपत्राद्वारे पैसे देऊन खरेदीखत करून घेतली होती. हे खरेदीखत बेकायदा आहे; म्हणून कुऱ्हाडे यांनी खेड दिवाणी न्यायालयात २०१८ मध्ये दावा दाखल केला होता. दाव्याचा निकाल जगताप यांच्या बाजूने नुकताच महिनाभरापूर्वी लागला. जगताप कुटुंबीय शनिवारी (ता. ४ जून) वाद मिळकतीवर गेले असता आरोपी बबनराव कुऱ्हाडे आणि त्यांच्या कुटुंबातील इतरांनी तलवार, कोयता, काठी, दगडाने मारहाण करत शेतात का आला; म्हणून वाद घालू लागले. त्यानंतर जगताप यांना मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे चारचाकी गाडीची काचा फोडल्याचे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

crime
राष्ट्रवादीच्या विद्या लोलगेंचा प्रताप; घरगुती गॅसची बेकायदेशीर विक्री उघड

शोभा कुऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, वाद मिळकत आरोपी जगताप यांना उसनवारी व्यवहारातून तारण म्हणून पैसे घेऊन बिनताबा साठेखत कुलमुखत्यारपत्राने दिली होती. अद्याप जमिनीचा ताबा आमच्याकडे होता. मात्र, संशयित आरोपी जगताप कुटुंबीयांनी तृतीयपंथी आणि अनोळखी पंधरा ते वीस गुंडांच्या माध्यमातून आम्हालाच मारहाण केली. यात जिवे मारण्याच्या हेतूने बबनराव कुऱ्हाडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. घरातील महिलांनाही मारहाण करण्यात आली असून गळ्यातील सोन्याची चैनही हिसकावून नेली आहे.

crime
मी मोदी किंवा अमित शहा नाही! रामराजेंचा रणजितसिंहांवर पलटवार

दरम्यान, प्रसाद राम जगताप, प्रशांत राम जगताप, हेमंत उर्फ सागर गुलाब कुऱ्हाडे, संदेश उत्तमराव कुऱ्हाडे अशा चौघांना आळंदी पोलिसांनी अटक केली असून इतर संशयित फरारी असल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com