पुणे : वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी पुण्यातील धनकवडी भागातील नऊ मंडळांनी गणपती प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक एकत्रित काढून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे पुण्यात सार्वत्रिक कौतुक होत आहे. या मंडळांचा आदर्श शहरातील इतर मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत घ्यावा, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. (Ganesh Festival Pune)
धनकवडी परिसरातील केशव मित्र मंडळ, पंचरत्नेश्वर मित्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि आखिल मोहन नगर मित्र मंडळ या या मंडळांचा यात समावेश आहे.
लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी एकाच ट्रॅक्टर ट्रॉलीवर तब्बल आठ मंडळांनी गणपतीच्या मूर्ती बसवून वाजत-गाजत मिरवणूक काढली. नऊपैकी एक मूर्ती भव्य आणि उभी असल्याने त्या मूर्तीसाठी वेगळ्या ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली.मंडळांच्या या भूमिकेचे या परिसरातील नागरीकांनीदेखील स्वागत केले आहे.
समाजासाठी आपण काही देणं लागतो तसेच एकात्मतेचा संदेश देण्यासाठी आणि महत्वाचे म्हणजे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी एकत्रित मिरवणूक काढल्याचे या मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. गणेशोत्सवात होणाऱ्या वाहतूक समस्येमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन एकत्रित मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.