वडमुखवाडीत गावठी बॉम्बचा स्फोट; पाच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू; दोघे जखमी

मृत्युमुखी पडलेल्या मुलीने खेळता खेळता त्यातील एक गावठी बॉम्ब दगडावर आपटल्याने स्फोट झाला, त्यातच ती मरण पावली.
Gavtti Bomb blast
Gavtti Bomb blastSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : भोसरीजवळील (bhosari) वडमुखवाडीत शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) एका गावठी बॉम्बचा मोठा स्फोट (Bomb blast) झाला, त्यात एक पाच वर्षीय बालिका ठार झाली, तर दोन मुले जखमी झाली आहेत. डुक्कर मारण्यासाठी आणलेले हे सुतळीसारखे बॉम्ब नंतर कचऱ्यात टाकून देण्यात आले होते. मृत्युमुखी पडलेल्या मुलीने खेळता खेळता त्यातील एक गावठी बॉम्ब दगडावर आपटल्याने स्फोट झाला, त्यातच ती मरण पावली. दरम्यान, या गंभीर प्रकाराबाबत तातडीने कारवाई करीत दिघी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले आहे. (Gavtti Bomb blast in Vadmukhwadi; Death of five-yearold girl; Both injured)

अलंकापुरम रोडवर दुपारी बाराच्या सुमारास नानाश्री हॉटेलमागील गोठ्याजवळ हा स्फोट झाला. त्यात राधा गोकुळ गवळी (वय ५) ही चिमुरडी जागीच मरण पावली. या स्फोटात तिचे हातपाय तुटून शंभर फूटांवर उडाले, एवढा प्रचंड हा स्फोट होता. राधाची बहीण आरती (वय ४) आणि चुलतभाऊ राजेश महेश गवळी (वय ४) ही दोन बालके जखमी झाली आहेत.

Gavtti Bomb blast
डिसले गुरुजींच्या विरोधात ZP सदस्य आक्रमक : परितेवाडीसंदर्भात चुकीची माहिती दिली!

बॉम्ब शोध आणि निर्मूलन पथकाला घटनास्थळी सुपारीच्या आकाराचे ४५ जिवंत बॉम्ब आढळून आले आहेत. घटनास्थळी पाल ठोकून राहिलेल्या फासेपारध्यांनी डुकरांची शिकार करण्यासाठी हे गावठी बनावटीचे सुतळी बॉम्ब आणले होते, असे दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

Gavtti Bomb blast
दूध पंढरीचा आखाडा : आमदार संजय शिंदेंच्या फार्महाऊसवरील बैठकीला परिचारकांची हजेरी

हे गावठी बॉम्ब तेथील कचऱ्यात टाकून हे फासेपारधी निघून गेले होते. त्या खेळण्याच्या वस्तू समजून ही मुले हे बॉम्ब घेऊन खेळत बसली होती. त्यावेळी राधाने एक बॉम्ब दगडावर आपटला असता, त्याचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडली. याबाबत दिघी पोलिसांनी विस्फोटक पदार्थ कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या सदोष मनुष्यवधाच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com