Video Pune BJP : कसब्यातील यशावरुन भाजपात 'पॉस्टर वॉर'! गौरव बापट संतापलेच...

Pune BJP Leaders are taking Credit of Murlidhar Mohol Win in Lok Sabha Election : भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषद, पतीत पावन संघटना, शिवसैनिक, मनसे, राष्ट्रवादी, रिपाइं आठवले गट, लोकजनशक्ती पक्ष, अनेक सामाजिक संघटना आदी कार्यकर्त्यांचा वाटा या विजयात असल्याचे गौरव बापट यांनी सांगितले.
Murlidhar Mohol, Girish Bapat, Gaurav Bapat
Murlidhar Mohol, Girish Bapat, Gaurav BapatSarkarnaMurlidhar Mohol, Girish Bapat, Gaurav Bapat

Pune Political News : पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाला आहे. महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या रवींद्र धंगेकर यांना त्यांच्याच मतदारसंघांमध्ये पिछाडी वरती राहायला लागला आहे. कासब्यामधून भाजपाला तब्बल 15 हजाराचा मताधिक्य मिळाल्याने याचे श्रेय घेण्यासाठी भाजपमधून चढाओढ सुरू आहे. यावरून दिवंगत माजी खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट संतापले आहेत.

कासब्यात सध्या पोस्टर वॉर पाहिला मिळत आहे. भाजपचे नेते पोस्टर लावून हा विजय आपल्यामुळेच झाला असल्याचा दावा करताना दिसत आहेत. यावरून आता गौरव बापट Gaurav Bapat यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. बापट म्हणाले, निवडणुका पार पडल्या. पुणे शहरातील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला. मुरलीधर मोहोळ खासदार झाले. अगदी लाखांच्या पुढे मताधिक्य मिळाले. परंतु या विजयात कोणी एकच वाटेकरी आहे, आणि माझ्यामुळेच कसे मताधिक्य मिळाले हे सांगण्याची अहमहमिका शहरातील काही भाजप नेते आणि काही व्यक्तीमध्ये सुरू आहे ते बघून वाईट वाटते.

या निवडणुकीत अनेक घटकांनी सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी Narendra Modi यांच्यावर मतदारांनी दाखवलेला विश्वास हा लोकसभा विजयातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, पतीत पावन संघटनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसैनिक, राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, रिपाइं आठवले गटाचे सर्व कार्यकर्ते, लोकजनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना या सर्वांचा वाटा या विजयात आहे, याकडेही बापटांनी लक्ष वेधले.

Murlidhar Mohol, Girish Bapat, Gaurav Bapat
Video Sharad Pawar News : जनसंवाद सभेत शरद पवार यांचं मोठं विधान; म्हणाले, 'सहा महिन्यांत राज्यात आपले सरकार ...'

मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांच्यावर जनतेने विश्वास दाखवला. ही व्यक्ती आपले प्रतिनिधित्त्व संसदेमध्ये करण्यास सक्षम आहे हा तो विश्वास होता. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. शहर अध्यक्षांचा सहभाग होता. नेता पराभवाची जबाबदारी घेतो, तर विजयाचे श्रेय कार्यकर्त्याला देतो. पुणे शहरातील लोकसभेचा विजय हा भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. मोदींच्या सक्षम नेतृत्वाचा विजय आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या लोकप्रियतेचा विजय असे ठासून सांगत बापट यांनी अमुक मतदारसंघात माझ्यामुळे मताधिक्य मिळाले हे सांगणे, त्याची सर्वत्र जाहिरात करणे, बॅनर लावणे हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

Gaurav Bapat Post
Gaurav Bapat PostSarkarnama

दिवंगत वसंतराव भागवतांचे, रामभाऊ म्हाळगी यांचे (ज्यांच्या नावाच्या प्रबोधिनीत आम्ही कार्यकर्ते शिक्षण घेतो) गिरीश बापटांचे हे संस्कार नाहीत. कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. मूळ आहे. स्वतःच्या नावाची टिमकी वाजवून आपण त्या कार्यकर्त्याला अपमानीत करतो आहोत. यातून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारतो आहोत. अधिक स्पष्टवक्तेपणा हा राजकारणात घातक असतो, असे दिवंगत गिरीश बापट मला सांगायचे. पण कधी कधी इलाज नसतो, असे म्हणत पोस्टरबाजी करणाऱ्यांचे कानही बापट यांनी टोचले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Murlidhar Mohol, Girish Bapat, Gaurav Bapat
Pune Porsche Accident : 'त्या' तरुण- तरुणीला मद्यधुंद दाखवण्याचा प्रयत्न अनिल देशमुखांचा खळबळ जनक दावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com