Girish Bapat's Last Interview: 'कार्यकर्त्यांचं कार्य मेलं, नुसते पुढारी राहिले,' ; खालावलेल्या राजकारणावर शेवटच्या मुलाखतीत बापट म्हणाले..

Girish Bapat Death : "मला एक तरी चौक दाखवा जिथे मी माझ्या आई वडीलांचं नाव दिलंय?"
Girish Bapat's Last Interview : Girish Bapat
Girish Bapat's Last Interview : Girish BapatSarkarnama

Girish Bapat Death : पुण्याचे खासदार व माजी पालकपंत्री गिरीश बापट (वय ७३) यांचे प्रदीर्घ आजारामुळे आज (बुधवारी) निधन झाले. आज सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.

गिरीश बापट यांनी आपली शेवटची मुलाखत सहा महिन्यांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिली होती. यामध्ये त्यांनी ढासाळलेली राजकीय संस्कृती, खालावलेल्या राजकारणाच्या पातळीवर भाष्य केले होते. या मुलाखतीत त्यांनी सर्वच राजकारण्यांना कानपिचक्या दिल्या होत्या.

Girish Bapat's Last Interview : Girish Bapat
Devendra Fadnavis on Girish Bapat : मुख्यमंत्री असतांना भाऊंमुळे मी चिंतामुक्त होतो; फडणवीसांनी सांगितला तो किस्सा

बापट म्हणाले, "राजकीय जीवनामध्ये सामाजिक, शैक्षणिक कार्य आपण करतो. समाजाच्या तळापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहचणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे खरं काम आहे. कार्यकर्त्याचं कार्य मेलं आणि फक्त पुढारीच राहिला. हे बरोबर नाही वाटत. आम्ही सतत चाळीस वर्ष काम करत राहिलो. समाज कुठेतरी नोंद घेत असतो. आपली बांधिलकी ही समाजाशी आहे. मतांच्या राजकारणासाठी काही करत राहिलो तर ते चुकीचं आहे. फ्लेक्स लावणं, पेपरला जाहीरात दिली, जेवणं दिली. ही काय वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे का?'

"मी पण काही संस्थांना नुकतंच एक लाख रूपये दिली. मी पण बॅनर लावू शकलो असतो. जेवणं दिली असती, केक कापू शकलो असतो. पण असं करू नये, आपल्याकडे लोक बघत असतात. आपला आदर्श ठेवत असतात. म्हणून कार्यकर्त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावं. पक्ष त्याची नोंद घेईल. आणि सगळ्यांनाच काही प्रतिनिधित्व मिळतं, असंही नाही. जागा मर्यादित आहेत, आरक्षणं आहेत. खरा आणि निर्मळ आनंद काम करण्यात असतो. एखाद्याचं काम केलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य़ आलं की, आम्हाला आनंद वाटतो," असे बापट म्हणाले होते.

Girish Bapat's Last Interview : Girish Bapat
Ravindra Dhangekar On Girish Bapat's Demise : गिरीश बापटांना धंगेकरांची श्रद्धांजली; म्हणाले, "कणखर नेतृत्व.."

"आज काल नव्या संस्कृतीमध्ये काम सोडूनच बाकीचं सगळं करतात. ते काही आमच्यासारख्यांना पटणारं नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो. भाजपचाही असो. आता मी पन्नास वर्ष राजकारणात आहे, मला एक तरी चौक दाखवा जिथे मी माझ्या आई वडीलांचं नाव दिलंय. ही कुठली प्रथा? आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे का? की सातबारावर आपलं नाव आहे? लोकांनी काम करण्याकरीता निवडून दिलंय. चांगला आदर्श जात नाही लोकांपुढे हे माझं दुखं आहे," अशी खंत ही बापटांनी व्यक्त केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com