Gram Panchayat Election Result : बड्या पक्षांना धूळ चारत भणंग ग्रामपंचायतीत अपक्ष उमेदवार विजयी

Gram Panchayat Election 2022 LIVE Updates : .चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा ग्रामपंचायत भाजपने ताब्यात घेतली आहे.
Gram Panchayat Election
Gram Panchayat Election sarkarnama

राज्यातील ग्रामपंचायतीचे निकाल हाती येत असून यात सातारा तालुक्यात प्रस्थापितांना धक्का बसला आहे. गावकऱ्यांनी बड्या पक्षांच्या उमेदवारांना नाकारुन चक्क अपक्ष उमेदवारांना निवडून दिले आहे. साताऱ्यातील जावली तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीचा धक्कादायक निकाल लागला आहे. निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. मतदारांनी सर्व अपक्ष निवडून दिले आहेत. त्यामुळे भणंग गावचा निकाल राज्यात लक्षवेधी ठरला आहे.

भिवंडीतील शिरोळे ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा फडकवला आहे. येथे मनसेचा सरपंच निवडून आला असून एकूण 9 सदस्यांपैकी मनसेच्या 6 सदस्यांनी विजय मिळवला आहे. नाशिक जिल्ह्यातील उंबर पाडा दिंगर ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक विकास आघाडीचे चिमण पवार यांचा विजय झाला आहे.भंडारा जिल्ह्यातील खराडी ग्रामपंचायत येथे काँग्रेसने खाते उघडले आहे. काँग्रेसच्या आरती हीवसे विजयी झाल्या आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात काँग्रेस 22 तर, भाजपने 20 जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय ठाकरे गटाने 8 जागांवर, शिंदे गटाने 5 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला आहे.

Nana Patole, Devendra Fadanvis, Eknath shinde
Nana Patole, Devendra Fadanvis, Eknath shindesarkarnama

नाना पटोलेंच्या साकोली मतदारसंघात भाजपचा झेंडा

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात भाजपने झेंडा फडकवला आहे. साकोलीतील शिरेगाव ग्राम पंचायतमध्ये भाजपपुरस्कृत रोहित संग्रामे विजयी झाले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदा ग्रामपंचायत भाजपने ताब्यात घेतली आहे. भाजपचे सरपंचांसह 15 सदस्य निवडून आले आहेत.

Gram Panchayat Election Result 2022
Gram Panchayat Election Result 2022sarkarnama

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये दहा पैकी आठ या मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना (balasahebanchi shivsena) यांनी विजय मिळवला आहे. विद्यमान आमदार योगेश कदम यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटास रायगड नंतर रत्नागिरी जिल्ह्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या गटापुढं मविआचे पॅनेल वरचढ ठरलं आहे.रत्नागिरीत सर्वात मोठी ग्रामपंचायत शिरगावमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या फरीदा काझी या विजयी झाल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांना व त्यांच्या गटास माेठा धक्का मानला जात आहे. काझी यांच्या विजयानंतर मविआच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

100 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 ठिकाणी भाजप, 15 ठिकाणी ठाकरे गट तर 14 ठिकाणी शिंदे गटाने विजय मिळवला आहे. काँग्रेस 17 तर काँग्रेसने 9 ठिकाणी विजय मिळवला आहे. तर उर्वरीत 22 ठिकाणी इतरांनी बाजी मारली आहे. भिवंडीमध्ये मनसेला काहीसा आधार प्राप्त झाला असून, खाते खोलण्यात यश आले आहे.

ग्रामीण भागात महाविकासआघाडी बऱ्यापैकी बाजी मारताना दिसत आहे. महाविकासआघाडीने आतापर्यंत 41 जागांवर बाजी मारली आहे. तर युती 37 जागा मिळवल्या आहेत. अद्यापही निकाल हाती येणे सुरु आहे. त्यामुळे हे आकडते सातत्याने बदलत राहणार आहेत. त्यामुळे अंतिम चित्र जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आकडेवारी आणखी बदललेली दिसणार आहेत.

Gram Panchayat election
Gram Panchayat electionsarkarnama

नंदुरबार जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील दोनशे ग्रामपंचायतींसाठी नुकतेच मतदान झाले. आज प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. सध्या तीन निकाल हाती आले आहेत. तिन्ही ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटास रायगडमध्ये धक्का बसला आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या गावची काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे (mva) गेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार चैतन्य महामुणकर हे विजयी झाले आहेत.

ठाण्यात राष्ट्रवादीच्या ताब्यात दोन ग्रामपंचायती आल्या असून शिंदे गटाकडे दहा ग्रामपंचायती आल्या आहेत. नाशिकमध्ये माकपनं खातं उघडलं आहे. भिंवडीत आघाडीने एका जागेवर झेंडा फडकवला आहे.

राज्यातल्या १८ जिल्ह्यांमधल्या १ हजार १६५ ग्रामपंचायतींच्या (gram panchayat)सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. आज (सोमवारी) सकाळी मतमोजणीस सुरवात झाली आहे. नुकत्याच हाती आलेल्या निकालावरुन नागपुरात कॉंग्रेसने खात उघडलं आहे, नंदुबारमध्ये पाच ग्रामपंचायतीवर भाजपने बाजी मारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com