Gram Panchayat Election Result live Update : फडणवीसांना धक्का; दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा झेंडा

राज्यभरातील 7135 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले होते.
Gram Panchayat Election Result live Update :
Gram Panchayat Election Result live Update :

दक्षिण सोलापूरमध्ये भाजप आमदार  सुभाष देशमुख यांनी दोन महत्त्वाच्या ग्रामपंचायती गमावल्या आहेत.  निम्बर्गी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सुरेश हसापूरे यांचे सुपुत्र श्रीदीप हसापुरे विजयी झाले आहेत.  तर मंद्रूप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे आप्पाराव कोरे यांच्या वहिनी अनिता कोरे सरपंचपदावर विजयी झाल्या आहेत. 

तसेच, बार्शी तालुक्यात भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत समर्थकांचे पॅनल विजयी झाले आहे. यात 22 पैकी 12 ग्रामपंचायतींवर राऊत समर्थकांचे पॅनलने विजय मिळवला आहे. तर दिलीप सोपल गटाने माढा तालुक्यातील आठ पैकी आठ ग्रामपंचयातींवर सत्ता मिळवली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपुरच्या फेटरी गावाततच फडणवीसांना धोबीपछाड देत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे.

उरणमधील ६ पैकी ३ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकवला आहे. आमदार महेश बालदी यांनी बाजी मारली आहे. तर ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर यांनीदेखील आपल्या गावाची ग्रामपंचायत राखली आहे.

उरण ग्रामपंचायत निवडणुकीत डोंगरी , सारडे, रानसई या तीन ग्रामपंचायतींवर भाजप विजयी झाली आहे. तर नवीनशेवा या ग्रामपंचयातींंवर ठाकरे गटाचा सरपंच, पुनाडे ग्रामपंंचायतींवर काँग्रेस – सेनेचा सरपंच विजयी झाल आहे. तर बोकडविरा ग्रामविकास आघाडी शेकापचे उमेदवार विजयी झाले आहेत.

नाशिकमधील पिंपळगाव बसवंत या सर्वाधिक श्रीमंत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली असून आता याठिकाणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भास्करराव बनकर गटाने बाजी मारली आहे. बनकर गटाने १७ पैकी १२ जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गटाचे भास्करराव बनकर हे पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतींवर सरपंचपदी विजयी झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील सातपाटी ग्रामपंचायतीमध्ये सतरा पैकी मनसेचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेचे सरपंच पदाचे उमेदवार अभिजीत तरे विजयी आहेत.  

परभणीत निकाल जाहीर होताना दगडफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दगडफेकीत तीन-चार जण जखमी झाले आहेत. वाडी दमईच्या उमेदवारांवर दगडफेक झाली. परभूत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयी उमेदवांरावर दगडफेक झाल्याचा प्रकास समोर आला आहे.

जळगावातील  मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा व उचंदे या दोन ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसेंनी गड राखला. भाजप शिंदे गटाने जोरदार ताकद लावूनही कुऱ्हा य ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. कुऱ्हा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे बिपिन महाजन यांचे पॅनल विजय झाले आहे. तर उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.

संगमनेर तालुक्यात इंदुरीकर महाराज यांच्या सासुबाई शशिकला पवार सरपंचपदी विजयी

आटपाडी तालुक्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या सरपंच पदावर विजयी झाल्या आहे. विशेष म्हणजे ग्राम पंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर पडळकरवाडीमध्ये ग आधी हिराबाई पडळकर यांना बिनविरोध सरपंच करण्याचा ठराव केला होता. पण निवडणूका चुरशीच्या बनल्याने पडळकरवाडी मध्ये देखील सरपंच पदासाठी चुरस पाहायला मिळाली.

शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले असून राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने तालुक्यात आपला राजकीय दबदबा कायम राखला आहे. याठिकाणी उमळवाड, औरवाड, नवे दानवाड, कनवाड, संभाजीपुर, अब्दुललाट, अकिवाट, कवठेसार, हेरवाड आणि चिंचवाड येथील ग्रामपंचायतींवर यड्रावकर गट आणि स्थानिक आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजप आमदार सुभाष देशमुख यांना दुसरा धक्का बसला आहे.  दक्षिण सोलापुरमधील मंद्रूप ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकला असून दूसरीकडे राष्ट्रवादीच्या आप्पाराव कोरे यांनीदेखील भाजप आमदार सुभाष देशमुख यांना धक्का दिला आहे.

नाशिक तालुक्यातील 13 पैकी 13 निकाल

1 किरण कोरडे-गिरनारे-शिंदे गट

2 कचरू वागळे- महीरावणी- शिंदे गट

3 मालती डहाळे-गणेशगाव-ठाकरे गट

4 रवींद्र निंबेकर-तळेगाव-ठाकरे गट

5 अगस्ति फडोळ-यशवंतनगर-भाजप

6 शरद मांडे- बेलगावढगा-अपक्ष

7 कविता जगताप-सामनगाव-ठाकरे गट

8 पर्वता पिंपळके-देवरगाव-काँग्रेस

9 प्रिया पेखळे-ओढा-ठाकरे गट

10 लेखा कळाले-लाडची-अपक्ष

11 एकनाथ बेझेकर-दुडगाव-ठाकरे गट

12 अरुण दुशिंग-एकलहरे-भाजप

13 सुरेश पारधे-साडगाव-राष्ट्रवादी

अहमदनगरमध्ये संगमनेर तालुक्यात विखे पाटलांचा उमेदवार विजयी, परळीत धनजंय मुंडेचे अनेक उमेदवार विजयी. जळगावात खडसेंच्या बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवार वंदना भोलाणे विजयी.

अमरावतीत युवा स्वाभिमानीचे सहा उमेदवार विजयी, भंडाऱ्यात सुकळी देव्हाडीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना धक्का. वेंगुर्ले तालुक्यात चिपी ग्रामपंचायतीवर भाजपचा सरपंच विजयी. बुलढाण्यात ठाकरे गटाचा विजय. अकोल्यात बोंदडमध्ये विजयी

यवतमाळ मध्ये रामनगर ग्रामपंचायतीत 45 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपचा विजय झाला आहे. यापुर्वी याठिकाणी गेली 45 वर्षे कॉंग्रेस सत्तेत होते.

पुण्यात भोर तालुक्यातील तीन गावात कॉंग्रेसने गुलाल उधळला. पुणे जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचयाती बिनविरोध झाल्या. बारामती तालुक्यातील सोरटेवाडी, कऱ्हाटी आणि पळशी या तीन ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. आहे. तिन्ही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. मावळ मध्ये राष्ट्रवादीने खातं उघडलं

कोकणात देवगड मध्ये भाजपने खातं उघडलं. रायगडमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व, रत्नागिरीत ठाकरे गटाचा विजय. पालघरमध्ये गुंडले ग्रामपंचायतीवर मनसेचे जयेश आहाडी सरपंचपदी विजय झाला आहे. सिंधुदुरगात कणकवलीमध्ये चार ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा.

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सात पैकी सहा जागांवर कॉंग्रेसचा विजय, काँग्रेसची 21 वर्षीय तरूणी प्रिया सराटे सरपंचपदी विजयी. तर उस्मानाबादमध्ये खामसवाडीमध्ये शिंदे गटाचा तर, कळंबच्या ग्रामपंचाय भाजपजा दणदणीत विजय.

सोलापूरमध्ये पंढरपुर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अजोती ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राष्ट्रवादीच्या उमेदवार आरती पाटील सरपंचपदावर विजयी विजयी झाल्या आहेत.

कोल्हापुरातील कागल तालुक्यातील बामणीत हसन मुश्रीफ यांच्या गटाला धक्का बसला असून या ठिकाणी समरजितसिंह घाटगे गटाचा विजय झाला आहे. तर व्हनाळीमध्ये माजी संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी झाले आहेत. शिरोळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाने तर पिराचीवाडीत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. हातकणंगले तालुक्यात रूकडी गावात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने सत्ता राखण्यात यशस्वी पण चुलत भाऊ आणि माजी उपसरपंच मोहन माने यांचा पराभव.

विदर्भातील एकूण २२७६ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज कोण बाजी मारणार याकडे संपुर्ण विदर्भवासियांसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. तर विदर्भासह सोलापूरमध्ये १४१८, कोल्हापूरात ४३१,सिंधुदुर्गमधील २९३, नागपूरात २३६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. त्यासोबतच नाशिकमधील १९६, अहमदनगर १९६५ आणि बीडमधील ६७० ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे.

Gram Panchayat Election Result : राज्यभरातील 7135 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान झाले होते. या ग्रामपंचायत(Gram panchyat) निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com