Pune Educational Fraud Case: शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; 50 हजारात द्यायचे दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र

Pune Police : 2700 विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Pune News:
Pune News:Sarkarnama

Pune Crime: दहावी, बारावीसह इतर अभ्यासक्रमाच्या नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या बनावट ऑनलाईन संस्थेतून तब्बल 2700 विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. दहावी, बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्र देऊन पास करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Pune News:
Pradeep Kurulkar: कुरुलकरांचा पाय आणखी खोलात; तपासातून खळबळजनक माहिती समोर

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवत संदीप ज्ञानदेव कांबळे या एजंटला पुण्यातील स्वारगेट परिसरातून काही दिवसांपूर्वी अटक केलं होतं. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने त्याच्या इतर साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम, कृष्णा सोनाजी गिरी (दोघे रा.छत्रपती संभाजीनगर) आणि अल्ताफ शेख (रा.परांडा,जि.धाराशिव) या तिघांना अटक केली.

या प्रकरणातील उर्वरित सहा जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या आरोपींनी स्वायत्त संस्था असलेल्या ‘महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल’ असं संकेतस्थळ तयार केलं होतं. या माध्यमातून नापास विद्यार्थ्यांना 30 ते 50 हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक प्रकार 2019 पासून सुरु होता.

Pune News:
Kalyan-Dombivli News : 'शिवसेना पक्षाची चादर बाजूला काढून अंधारेंनी महाराष्ट्रात फिरावे; बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण जनता त्यांना सांगेल'

प्राथमिक तपासात दहावीच्या 35 विद्यार्थ्यांना पास झाल्याचे प्रमाणपत्र दिले असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून हा आकडा जवळपास 2700 वर पोहचला आहे. दरम्यान, या प्रकरणातील चारजणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर इतर सहाजणांचा शोध घेण्यात येत आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com