BJP Haveli Taluka: पूर्व हवेलीत भाजपाला नवे बळ; एकाच वेळी 100 जणांचा प्रवेश
सुवर्णा कांचन
उरुळी कांचन: पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व हवेली तालुक्याच्या चार गटांपैकी तीन गट महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. इच्छुकांची राजकीय गणितं कोलमडली आहेत. त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.
हवेली तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी नेतेमंडळी पुन्हा भाजपाच्या गोटात येत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी अध्यक्ष आणि हवेलीतील ज्येष्ठ राजकीय नेते चित्तरंजन नाना गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये घरवापसी केली आहे. मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा भाजपात प्रवेश केला.
या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राहुल कुल, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. या वेळी हवेली तालुक्यातील अनेक माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांनीही भाजपात प्रवेश केला.
यामध्ये माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, लोकनियुक्त सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य गौरी गायकवाड, उपसरपंच नासिरखान मनूलाखान पठाण, तसेच ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, सिमिता लोंढे, बिना काळभोर, राजश्री काळभोर, मंदाकिनी नामुगडे, अविनाश बडदे, स्वप्नेश कदम, सोनाबाई शिंदे, सलीमा पठाण, माजी सदस्य रुक्मिणी चांदणे, वसुधा केमकर, रमेश कोतवाल, माधुरी काळभोर, अशोक शिंदे, राणी बडदे, तंटामुक्ती अध्यक्ष अभिजित बडदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम आदींसह तब्बल १०० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
“चित्तरंजन नाना गायकवाड यांच्यासारख्या अनुभवी व कार्यक्षम नेतृत्वामुळे पक्षाला नक्कीच नवे बळ मिळेल. हवेली तालुक्यात पक्षसंघटन अधिक व्यापक होईल,” असे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
राहुल कुल म्हणाले, "गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते पुन्हा भाजपात आले आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय अधिक भक्कम होईल,” हवेली तालुक्यात भाजपाला पहिल्या क्रमांकावर आणणार, असा निर्धार गायकवाड यांनी केला आहे. “भाजपाच्या विकासवादी विचारधारेवर माझा पूर्ण विश्वास आहे.
"पुन्हा एकदा पक्षात सक्रियपणे काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद वाटतो. हवेली तालुक्यात भाजपाला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे,” असे गायकवाड म्हणाले. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश व जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच हवेली व पुणे ग्रामीण भागातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रवेशामुळे हवेली तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला नवे ऊर्जा व बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.