खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी नायडू रुग्णालयातील छाया सिस्टरशी बोलले...

नायडू हाॅस्पिटलमधील परिचारिकेला पंतप्रधान कार्यालयातून स्वतः पंतप्रधानांकडूनविचारणा होणे, असे पहिल्यांदाच घडले...
pmo office called nurse from nayadu hospital
pmo office called nurse from nayadu hospital

पुणे : "तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना, कोरोनाचे पेशंट हाताळताना तुमच्या नेमक्या काय भावना असतात,  तुम्ही हे काम करीत असल्याने तुमचे कुटुंबीय चिंतेत तर नाहीत ना,  नीट काळजी घ्या आपण सर्वजण मिळून कोरोनाला देशातून घालूयात," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील नर्स छाया जगताप यांची फोनवरून विचारपूस केली.

पंतप्रधान कार्यालयातून आज रात्री पावणेआठच्या सुमारास छाया यांना मोदींचा फोन आला आणि त्यांनी नर्सेस से काम कसे सुरू आहे, याची माहिती घेत रुग्णालयातील नर्सेसची विचारपूस केली त्यांना धीर दिला. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत 'तुम्ही स्वतःची काळजी नीट घेतात ना', असे विचारून संभाषणाला सुरुवात केली. तुम्ही एवढ्या जोखमीच्या ठिकाणी काम करत आहात मग तुमच्या परिवाराला तुमच्याविषयी काळजी  वाटत असेल ना, असेही मोदी यांनी विचारले.

याशिवाय जेव्हा रुग्णालयात पेशंट येतात तेव्हा ते घाबरलेले असतात का? त्यांच्याशी तुम्ही कसा संवाद साधता, पेशंटला कसा धीर देता त्यांच्यातील भीती कशी घालता आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या परिवाराला ही कसे आश्वस्त करता, अशी चौकशी त्यांनी केली.  

पेशंटची भीती घालवण्यासाठी नर्सेस  काय करतात  याची माहिती छाया यांनी पंतप्रधानांना दिली.  देशभरात हजारो नर्सेस या  रोगाचा सामना करण्यासाठी काम करत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देत मोदी यांनी त्यांचे आभार ही मानले. 
 छाया यांनीही पंतप्रधानांना तुम्ही  आवर्जून फोन केला याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.

छाया जगताप या नायडू रुग्णालयात गेली वीस वर्षापासून कार्यरत आहेत. स्वाईन फ्लू च्या काळातही त्यांनी अनेक पेशंट हाताळले आहेत. "आमच्या घरच्यांना आमच्याविषयी खरोखरीच चिंता असते. पण आम्ही पूर्ण काळजी घेऊन काम करत असतो. कुठल्याही पद्धतीने संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतो, असे छाया यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. नायडू हॉस्पिटल मध्ये सात रुग्ण बरे होऊन गेले आहेत, तर सध्या नऊ रुग्ण उपचार घेत आहेत, त्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही लवकरच डिस्चार्ज मिळेल असेही त्या म्हणाल्या. हॉस्पिटलच्या वतीने इथला सर्व कर्मचारी वर्ग डॉक्टर्स आणि नर्सेस यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com