वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; एकनाथ पवारांचे आवाहन

BJP |PCMC Politics| राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातील सहकारी आणि हितचिंतकांनीही माझा वाढदिवस साजरा करु नये.
BJP |PCMC Politics|   Eknath Pawar
BJP |PCMC Politics| Eknath Pawar

PCMC Politics : पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजप अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे ( वय ६५ वर्षे,रा.भोसरी) यांचे बरोबर महिन्यापूर्वी ( २४ सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यामुळे भाजपचे (BJP) पिंपरी-चिंचवडकर प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार हे उद्याचा (ता.२५) आपला वाढदिवस एरव्हीसारखा धुमधडाक्यात साजरा करणार नाहीत. आपल्या वाढदिवसावरील खर्च टाळून पूरग्रस्त शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

राजकीयच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातील सहकारी आणि हितचिंतकांनीही माझा वाढदिवस साजरा करु नये. यानिमित्त पक्ष कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी कोणतेही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत,त्यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी, लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन एकनाथ पवार यांनी केले आहे.

BJP |PCMC Politics|   Eknath Pawar
दरोड्याच्या थराराने नाशिक हादरलं; वाचुन तुम्हालाही फुटेल घाम...

एकनाथ पवार यांचे भोसरीशी विशेष नाते आहे. भाजप पिंपरी महापालिकेत गत टर्मला २०१७ ला सत्तेत आल्यानंतर ते गटनेते बनले होते. त्यांचा प्रभागही भोसरी विधानसभा मतदारसंघात मोडतो. त्यांनी २०१४ ला भोसरीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती.त्यावेळी दुसऱ्या क्रमाकांची मते त्यांना मिळाली होती.तर, सध्याचे आ. लांडगे हे त्यावेळी अपक्ष म्हणून विजयी झाले होते.दरम्यान,मूळ भाजपाई असल्याने गटनेतेपदावरून उतरताच पक्षाने त्यांना प्रदेश प्रवक्तेपदावर बढती दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com