Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama

Tanaji Sawant News : पुण्यात तानाजी सावंत यांचा 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर लागले; चर्चांना एकच उधाण!

Pune Political News : तानाजी सावंत यांची राजकीय महत्त्वाकांक्षेला पंख फुटल्याची एकच चर्चा समाज माध्यमात होत आहे.
Published on

Pune News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुण्यात चक्क 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनेर लावले गेले आहेत. सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे सावंत यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला पंख फुटल्याची एकच चर्चा समाज माध्यमात होत आहे. (Latest Marathi News)

तानाजी सावंत यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून पुण्यातील कात्रज चौकात सावंत यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असं करत बॅनरबाजी केली गेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तसेच हे बॅनर सावंत यांच्या संमतीने लावले आहेत, की कार्यकर्त्यांनी अतिउत्साहीपणात हे बॅनर लावले आहेत, याचीही चर्चा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुण्यात गजबजलेल्या कात्रज चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरवर भावी मुख्यमंत्री माननीय नामदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) साहेब आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा असा उल्लेख या बॅनरवर आहे. त्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com