पुणे जिल्ह्यात आज सर्वाधिक ८ हजार ६०५ रूग्ण पुण्यातील संख्या ४ हजार ४५८ वर : ३२ जणांचा मुत्यू

दिवसभरात तब्बल ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
corona.jpg
corona.jpg
Published on
Updated on

पुणे : पुणे शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (ता.३१) एकाच दिवसात विक्रमी ८ हजार ६०५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४ हजार ४५८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात तब्बल ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ३२ जणांचा समावेश आहेत.

दरम्यान, गेल्या चोवीस तासात ५ हजार ७४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आजच्या एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३ हजार३७४ ,
पिंपरी चिंचवडमधील १ हजार ४१०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६७८, नगरपालिका हद्दीतील २०८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ७९ रुग्ण आहेत. आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये २ हजार २८८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात१ हजार३१९ , नगरपालिका क्षेत्रात ३९७ आणि
कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १४३ नवे रुग्ण सापडले आहेत. आजच्या दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पिंपरी चिंचवडमधील १५, जिल्हा परिषद आणि
कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी दोन आणि नगरपालिका हद्दीतील पाच रुग्णांचा समावेश आहे.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात एकूण ६१ हजार ९०९ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १६ हजार १५५ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित
४५ हजार ७५४ जणांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार ८११, पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ३२९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४ हजार ३६२, नगरपालिका हद्दीतील २ हजार ३५८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील
२९५ रुग्ण आहेत.
Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com