गृहमंत्री वळसे पाटलांच्या भीमाशंकर कारखान्याने फोडली एफआरपीची कोंडी!

भीमाशंकर साखर कारखाना शेतकऱ्यांना देणार एकरकमी २६१३ रुपये एफआरपी
Dilip walse Patil-Balasaheb Bende
Dilip walse Patil-Balasaheb BendeSarkarnama
Published on
Updated on

पारगाव (जि. पुणे) : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांचे वर्चस्व असलेल्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने (Bhimashankar Sugar Factory) पुणे जिल्ह्यातील एफआरपीची (FRP) कोंडी फोडली आहे. चालू हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी २६१३ रुपये एफआरपी देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी आज जाहीर केले आहे. (Home Minister Dilip Walse Patil's Bhimashankar Sugar Factory give one time of Rs 2613 FRP)

गृहमंत्री तथा कारखान्याचे संस्थापक संचालक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेयनगर-पारगाव येथे कारखान्याच्या कार्यस्थळी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार चालू २०२१-२२ मध्ये गाळप होणाऱ्या उसाला एफआरपीनुसार एकरकमी २६१३ रुपये प्रतीटन देण्यात येणार आहेत. भीमाशंकर कारखान्याने पुणे जिल्ह्यात सर्वांच्या अगोदर एफआरपी जाहीर करून एफआरपीबाबतची कोंडी फोडली आहे. एकरकमी एफआरपी देण्याचे जाहीर केल्याने जिल्ह्यातील इतर कारखान्यांपुढे एकरकमी एफआरपी देण्याचे आव्हान असणार आहे.

Dilip walse Patil-Balasaheb Bende
...अन्यथा पहिल्या बैठकीपासूनच PMRDAविरोधात संघर्ष

भीमाशंकर साखर कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. कारखान्याने उसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. पंधरावडा ऊस बिलाप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल, असे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

Dilip walse Patil-Balasaheb Bende
लातूर जिल्हा बॅंकेवर देशमुखांचे वर्चस्व कायम; टाॅसवर भाजपनेही एक जागा जिंकली

अध्यक्ष बेंडे म्हणाले की, भीमाशंकर कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची कामे केल्यामुळे गाळप क्षमतेत वाढ झालेली आहे. गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये कारखाना कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या नोंदीनुसार दहा लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यादृष्टीने हार्वेस्टर, ट्रक/ट्रॅक्टर टोळीसह, ट्रॅक्टर टायरगाडी व बैलटायरगाडी यांचे करार केलेले आहेत. सोमवारअखेर (ता. २२ नोव्हेंबर) एक लाख ५९ हजार टन उसाचे गाळप करुन ९.९५ टक्के सरासरी साखर उताऱ्याने एक लाख ५५ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास ऊस गाळपास देवून सहकार्य करावे, असे आवाहनही बेंडे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com