Pune News : कागदपत्रांमध्ये फेरफार करून 'यूपीएससी'ची परीक्षा देत 'आयएएस' झालेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबत आता मोठी माहिती समोर येत आहे. यूपीएससीची परीक्षा देताना खेडकर यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र दिले होते. हे प्रमाणपत्र नियमबाह्य असल्याचा अहवाल यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांकडे दिला आहे.
पूजा खेडकर यांच्या बाबत आलेला हा नवीन अहवाल पिंपरी चिंचवड महापालिका (PCMC) आयुक्तांकडून राज्याचे दिव्यांग आयुक्तांकडे दिला जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आयएएस अधिकारी खेडकर यांच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना पूजा खेडकर यांनी दिव्यांग या आरक्षणाचा फायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्यासाठी त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम (YCM Hospital) हॉस्पिटलमधून दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवले होते.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण समोर आल्यानंतर यामध्ये अनेक गोष्टींचे खुलासे होऊ लागले आहे. आपल्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे दाखवून पूजा खेळकर यांनी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट देखील मिळविल्याचे समोर आले आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर केलेल्या आपल्या विविध उद्योगामुळे पूजा खेडकर चांगल्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी केलेल्या 'प्रतापां'ची दखल घेत केंद्र सरकारने सध्या त्यांची चौकशी सुरू केली आहे.
त्यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करून त्यांना तातडीने मसूरी येथे हजर होण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही त्या मसूरी येथे हजर राहिल्या नसल्याचे समोर आले आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे (Police) छळवणूकीची तक्रार केली होती. ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली असून यावर आपला जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी खेडकर यांना तीन वेळा समंस पाठवून जबाब नोंदवण्यासाठी यावे असे सांगितले होते. मात्र याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर दिल्या काही दिवसांपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी वायसीएम मधून घेतलेला दिव्यांग सर्टिफिकेट नियमबाह्य पद्धतीने घेतले असल्याचे आता समोर आले आहे. याबाबतचा आपला फेर अहवाल वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे सादर केल्याचे कळते. हा अहवाल दोन पानांचा असून तांत्रिक बाबी आणि शासकीय निकषाच्या आधारे पूजा खेडकर यांना अपंगत्वाचा दाखला दिला असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिका आयुक्त हा अहवाल पुढील कारवाईसाठी दिव्यांग आयुक्तांकडे पाठवणार असून यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी अधिकच वाढणार असल्याचे आता निश्चित झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.