हिंम्मत असेल तर सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावी

विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या.
चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

सरकारनामा

पुणे : गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेतली तर काय निकाल लागतो हे अकोला व नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे. हिंम्मत असेल तर राज्य सरकारने याच पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज दिले.

<div class="paragraphs"><p>चंद्रकांत पाटील</p></div>
पुरावे देऊनही परबांच्या विरोधात कारवाई होत नाही; सोमय्यांचा आरोप

दोन्ही जागांच्या निवडणुकीच्या निकालानंतर पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘ या निकालानंतर विरोधक पराभवाचे कारण सांगताना काहीही आरोप करतील. मात्र, नाचता येईना आंगण वाकडे अशी विरोधकांची स्थिती आहे.मुळात नागपूर ज्या जागेवर ज्यांचे विद्यमान आमदार आहेत. त्या जागा सोडण्याचे कॉंग्रेसने आधी मान्य केले. मात्र, नागपूरच्या जागेवर त्यांनी लढण्याचा हट्ट कायम ठेवला. मुळात त्यांचा पराभव ठरलेला होता. तरीही या निवडणुकीत कॉंग्रेसने केवळ पोरखेळ केला. या निमित्ताने मंत्री असलेले सुनील केदार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील मतभेद आणि स्पर्धा या निमित्ताने सर्वांच्या समोर आली आहे.’’

<div class="paragraphs"><p>चंद्रकांत पाटील</p></div>
हिंदू आहात तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा : चंद्रकांतदादांचे आव्हान

विधान परिषदेच्या सहापैकी चार जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. मुळात या निवडणुका बिनविरोध व्हायला हव्या होत्या.विधानसभा निवडणुकीतील प्रघात या निमित्ताने पाळता आला असता. पण तो प्रघात कॉंग्रेसने मोडला आणि अपेक्षित निकाल लागला. निवडणुका बिनविरोध झाल्या असत्या तर यंत्रणांवरचा अनावश्‍यक ताण कमी झाला असता. मात्र,कॉंग्रेसच्या हट्टामुळे निवडणूक झाली.त्यावर मात करीत नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यातून वसंत खंडेलवाल विजयी झाले.गुप्त मतदान केले तर निकाल काय लागतो हे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे पाटील यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘ एका मागोमाग होणारा परीक्षांचा घोटाळा हा या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे. धडपणे एकही परीक्षा यांना घेता येत नाही. मुळात परीक्षांचे नियोजन करताना कुठलीही यंत्रणा नीटपणे काम करत नाही.राज्य सरकारचे या यंत्रणेवर नियंत्रण नाही.सरकारमध्येच सारा गोंधळ असल्याने राज्य सरकार यंत्रणा नीटपणे हाताळू शकत नाही. परिणामी या यंत्रणा पेपर फोडून गैरप्रकार करत आहेत.’’

पुण्यात महानगरपालिकेची प्रभाग रचना सुरू आहे. मुळात कुठेही प्रभाग रचना करताना काही सूत्रं पाळावे लागते.ती पाळायला हवीत.अन्यथा लोक न्यायालयात जातील, हे या सरकारने लक्षात ठेवावे. अनेक मुद्यावर गेल्या दोन वर्षात आम्ही न्यायालयात गेलो प्रत्येक केसमध्ये या सरकारचा पराभव झालेला आहे.त्यामुळे प्रभाग करताना किमान नियम पाळले नाहीत तर लोक न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय राहणार नाहीत, हे या सरकारने लक्षात घ्यावे, असा इशारा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com