Pankaja Munde : कसब्यात बापटांचा आशिर्वाद आवश्यक वाटला असेल; पंकजा मुंडेंचा भाजपलाच चिमटा

Eknath Shinde : कार्यकर्ता पक्षाचे नेतृत्व करू शकतो हा संदेश एकनाथ शिंदेनी दिला
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama

Kasba By Election : खासदार गिरीश बापट (Girish Bapat) सध्या आजारी आहेत. त्यांच्या नाकाला ऑक्सिजनची नळी बसविलेली आहे. व्हिलचेअर बसून त्यांनी मेळावा घेतला. त्यांना थेट प्रचारात उतरविल्याने भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसने सडकून टीका केली. त्यानंतर भाजपच्या फायरब्रॅंड नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी काल (ता. १९) चिंचवडमध्ये संयमी प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यातून त्यांनी आपल्या पक्षालाच चिमटा काढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

गिरीष बापट (Girish Bapat) हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांची प्रकृती ठीक नाही. पक्षाला या निवडणुकीसाठी त्यांचा आशिर्वाद आवश्य़क वाटला असेल, असे पंकजा म्हणाल्या. त्याला हरकत असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चिंचवड (Chinchwad) विधासनभा पोटनिवडणुकीतील पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या. रहाटणी येथील प्रचारसभा झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मतप्रदर्शन केले. त्यानंतर राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी भाजपला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Pankaja Munde
Chandrakant Khaire News : बीजेपी युज अँड थ्रो पार्टी, ठाकरेंच्या पाठीशी मजबुतीने उभे राहा..

शिवसेना (Shivsena) हे पक्षाचे नाव आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला मिळाले. त्यावर भाष्य करताना सध्याचा काळ हा सर्वांसाठी कसोटीचा असल्याचे पंकजा म्हणाल्या.

मुंडे म्हणाल्या, "कार्यकर्ता हा नेत्याचा वारस होऊ शकतो. तो पक्षाचे नेतृत्व करू शकतो, हा संदेश शिंदे यांनी दिला. तो यशस्वी करण्यासाठी त्यांना त्यांच्याबरोबर असलेल्यांना पुन्हा निवडून आणण्याची कामगिरी करावी लागणार आहे."

Pankaja Munde
Ashok Chavan News : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा : अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले...

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आता नाव आणि चिन्ह नसताना पक्ष उभा करावा लागणार आहे. त्या उद्धव ठाकरेंना भाऊ मानत असल्याने बहीण म्हणून त्यांना काय सांगणार असे विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, "ते तुमच्यासमोर का बोलू? त्यांना सल्ला देण्याएवढी मी मोठी नाही. मी सर्वांची धाकटी बहीण आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com