PCMC Ganeshotsav News: 'गुड न्यूज' : पिंपरी महापालिकेचा गणेश मंडळांना दुसरा सुखद धक्का

PCMC Police : महापालिकेसोबत पोलिसांनीही ऑफलाईनऐवजी ऑनलाईन परवानगी देण्याचा निर्णय घेऊन गणेश मंडळांना गुड न्यूज देण्याची हॅटट्रिकच केली.
PCMC News
PCMC NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Ganeshotsav News: येत्या १९ तारखेपासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवासाठी सलग पाच वर्षाची एकदाच परवानगी देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेऊन राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यावर्षी पहिली गुड न्यूज दिली. त्यानंतर आता गणेश मंडळांचे मंडप भाडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने माफ करून त्यांना दुसरी चांगली बातमी दिली. तर, महापालिकेसोबत पोलिसांनीही ऑफलाईनऐवजी ऑनलाईन परवानगी देण्याचा निर्णय घेऊन गणेश मंडळांना गुड न्यूज देण्याची हॅटट्रिकच केली.

या तीन सुखद धक्यांमुळे उद्योगनगरीतील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल त्यांनी महापालिकेचे त्यांनी आभार मानले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास आवश्यक विविध प्रकारच्या परवानग्या / ना हरकत दाखले पिंपरी महापालिका तसेच पोलिसांकडून देण्यात येतात. यापूर्वी त्या ऑफलाईन पध्दतीने देण्यात येत होत्या. त्यासाठी मंडाळाच्या कार्यकर्त्यांना पालिका कार्यालये आणि पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जात होता.

PCMC News
INDIA Alliance News : मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र आलेल्या 'इंडिया' आघाडीत 'बिघाडी'; 'हे' आहे कारण

तसेच पालिका कार्यालये व पोलीस (Police) ठाण्यांत गर्दीही होत होती. ती टाळून गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा वेळ वाचावा म्हणून पिंपरी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्या संकल्पनेतून प्रथमच गणपती मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारुन ती देण्याची व्यवस्था यावर्षी करण्यात आली आहे. तशीच मंडप परवानगीही पोलीस ऑनलाईन देणार आहेत.

पोलीस आणि पालिकेच्या वेबसाईटवर त्यांच्या परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी या दोन्ही साईटस एकमेकांशी लिंक करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर गणेशोत्सव 2023 या लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधित मंडळास आपली नोंदणी करावी लागेल. ती करताना अध्यक्षांचा मोबाईल क्रमांक हा पुढील ओटीपीसाठी वापरण्यात येईल. मंडळाच्या अंतर्गत येणारे पालिकेचे क्षेत्रीय कार्यालय व निवडणूक प्रभाग यांची नोंद केल्यानंतर अर्ज सबमीट झाल्याची नोंद होईल. क्षेत्रिय कार्यालयास प्राप्त होईल, नंतर त्यावर प्रोसेस करून मंडळ अध्यक्षांच्या मोबाईलवर ऑनलाईन परवानगी पाठवली जाणार आहे.

पालिकेची ऑनलाईन परवानगी ही पोलिसांच्या लॉगिनला देखील पाहता येणार आहे. त्यातून पोलीस परवानगीलाही वेळ लागणार नाही. पोलिसांच्या ऑनलाईन परवानगीकरिता मंडळाने आपले पोलीस ठाणे निवडायचे आहे. त्यासाठीही मंडळ पदाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर हे ओटीपी पाठवून निश्चित केले जाणार आहेत.

पोलिसांची लाऊडस्पिकर आणि वाहतूक विभागाची परवानगी देखील ऑनलाइन मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलीस आयुक्तालाचे क्षेत्र हे पिंपरी पालिकेच्या हद्दीबाहेरही असल्याने तेथील नगरपरिषद, नगरपालिका व ग्रामपंचायत यांना देखील सदर अर्ज ऑनलाईन पाठवण्यात येणार आहेत. गणेश मंडळाना विविध परवानग्या या वेळेत व सुलभपणे देण्याचा पालिका तसेच शहर पोलीसांचा मानस असून त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका आयुक्त शेखरसिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

PCMC News
Jitendra Awhad News : बनवाबनवी करून मिठी मारणाऱ्याचा महाराष्ट्रामध्ये कोथळा बाहेर काढला जातो; आव्हाडांचे मुंडेंना सणसणीत प्रत्युत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com