INDIA Alliance News : मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र आलेल्या 'इंडिया' आघाडीत 'बिघाडी'; 'हे' आहे कारण

National Political News : ...यामुळे नरेंद्र मोदी सरकारविरोधातील आपली भूमिका कमकुवत होणार नाही का ?
India Alliance
India Alliance Sarkarnama

New Delhi : भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशपातळीवरील २८ राजकीय विरोधी पक्षांनी एकत्र मोट बांधत 'इंडिया' आघाडी उघडली आहे. या काँग्रेस प्रणित आघाडीचा एकमेव उद्देश हा कुठल्याही परिस्थितीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्थात भाजपाचा सुपडासाफ करायचा आहे.

यातच इंडिया आघाडीतील नेतेमंडळींकडून लोकसभा निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याचे दावेही केले जात आहे. पण असे असतानाच इंडिया आघाडीत 'खटके' उडण्यास सुरुवात झाली आहे. आता जी -20 परिषदेवरुन विरोधकांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा आहे.

India Alliance
Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार: धाराशिव, लातूरमधून इच्छुकांच्या आशा पल्लवित; चौगुले, निलंगेकर, की राणाजगजितसिंह...

दिल्लीतील G 20 शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. रविवारी या शिखर परिषदेचा शेवटचा दिवस पार पडला. मात्र, सत्ताधारी भाजपकडून या परिषदेचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रण न दिल्यामुळे काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

अशातच इंडिया आघाडीचे घटक असलेल्या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय 'डिनर' सोहळ्याला उपस्थिती लावली. एकीकडे मोदींविरोधात रणशिंग 'इंडिया'(INDIA Alliance) आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या प्रमुख नेतेमंडळींनीच या 'शाही भोजन' कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना जी 20 परिषदेचं नसताना मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, हेमंत सोरेन यांच्यासह खुद्द काँग्रेसचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांची भोजन सोहळ्यातील उपस्थितीवरुन राजकारण तापणार असल्याचे चिन्हे आहेत.

अधीर रंजन चौधरी काय म्हणाले ?

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी(Adhir Ranjan Chowdhury) यांनी ममता बॅनर्जी आणि बिहार काँग्रेसवर नितीश कुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आमंत्रित केलेल्या डिनरला विरोधी पक्षातील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. हे काँग्रेसला आवडलेलं नाही.

India Alliance
Rohit Pawar News : मराठा आरक्षणासाठी आमदार रोहित पवारांनी सुचविला 'हा' उपाय; म्हणाले...

तसेच ममता बॅनर्जी या नेत्यांसोबत डिनरसाठी दिल्लीला जाण्यास कशामुळे प्रवृत्त झाल्या. त्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागे दुसरे काही कारण आहे का? त्यांच्या अशा निर्णयांमुळे नरेंद्र मोदी सरकारविरोधातील आपली भूमिका कमकुवत होणार नाही का असा सवालही त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले.

काँग्रेसच्या टीकेवर तृणमूलचं जोरदार प्रत्युत्तर...

ममता बॅनर्जीं(Mamata Banerjee) वर टीका करणाऱ्या काँग्रेसला तृणमूल काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विरोधी आघाडी भारताला अस्तित्वात आणण्याच्या प्रमुख सुरुवातीच्या शिल्पकारांपैकी एक आहेत. काही गोष्टी प्रोटोकॉलनुसार असतात. ममता बॅनर्जी यांनी काय करावे हे त्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही असा पलटवार त्यांनी केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

India Alliance
Maratha Reservation Solution : मराठा आरक्षण : राज्य सरकारपुढील अडचणीत वाढ; मार्ग काढण्यासाठी बैठकांचा धडाका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com