पुण्यातील पाच आमदारांना तिकीट नाही मिळणार!

पुण्यात नगरसेवकपदापासून आमदार, खासदार व राज्यात मंत्रीपदापर्यंत यशाची चढती कमान असलेले खासदार गिरीश बापट हे अलिकडचे मोठे उदाहरण आहे.
Pune PMC
Pune PMCSarkarnama

पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग असतील हे निश्‍चित झाले आहे. आरक्षण आणि प्रभागरचना यामुळे अनेक नगरसेवकांचे पत्ते कट होण्याची चिन्हे आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत पाच `नगरसेवकांचा` पत्ता कट होण्याची 100 टक्के खात्री देण्यात येत आहे.

कारणे हे पाच नगरसेवकाचे आमदार झालेले आहेत. विधीमंडळ आणि पुणे महापालिका दोन्ही ठिकाणी ते सदस्य आहेत. आमदार असलेल्या मंडळींनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्याचे उदाहरण आतापर्यंत तर नाही. त्यामुळे या पाच जणांच्या जागी नवीने चेहरे येण्याची चिन्हे आहेत.

या पाच जणांमध्ये आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे व सुनील कांबळे या भारतीय जनता पक्षाच्या तीन तर चेतन तुपे व सुनील टिंगरे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन आमदारांचा समावेश आहे. टिळक या कसबा विधानसभा मतदारसंघातून, शिरोळे शिवाजीनगरमधून व कांबळे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून निवडून आले आहेत. चेतन तुपे हडपसर मधून तर टिंगरे वडगाव शेरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. यातील काही जण आपल्याच घरातील व्यक्ती महापालिका निवडणुकीसाठी पुढे आणण्याची शक्यता आहे.

Pune PMC
प्रभाग रचनेसाठी आता निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतिक्षा

महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्यत: सत्ताधारी भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात मुख्य लढत होणार आहे.आमदार असलेल्या पाचही मतदारसंघात भाजपाची ताकद गेल्या निवडणुकीत दिसून आली आहे.त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस ताकदवान आहे. मात्र, राज्यात सत्तेत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात सत्तेत येण्यासाठी कंबर कसली आहे.

Pune PMC
पुण्यात अजूनही साडेतीन लाख पहिल्या तर १८ लाखजण दुसऱ्या लशीपासून वंचित

पुण्यात नगरसेवकपदापासून आमदार, खासदार व राज्यात मंत्रीपदापर्यंत यशाची चढती कमान असलेले खासदार गिरीश बापट हे अलिकडचे मोठे उदाहरण आहे. बापट हे महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक होते.स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यानंतर सलग पाच वेळा ते कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.राज्यात कॅबिनेट मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे. बापट सध्या पुण्याचे विद्यमान खासदार आहेत. बापट यांच्यासारखी चढत्या आलेखाची संधी राजकाणात फार कमी लोकांना मिळते.

बापट यांच्याप्रमाणेच महापालिकेतील यशस्वी कारकिर्दीनंतर आमदारकी मिळालेल्या या पाचजणांची राजकीय यशाची कमान अशीच चढती राहण्यासाठी त्यांच्या पक्षाकडून त्यांना योग्यवेळी संधी मिळायला हवी.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com