Shirur Lok Sabha Constituency : आता 'शिरूर'मधून पैलवान आमदार महेशदादांनीही थोपटले दंड, आढळरावांचे काय होणार?

Amol Kolhe News : राष्ट्रवादीने डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी पक्षाने आज जवळपास नक्की केली.
Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol Kolhe
Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : शिरूरमध्ये २०२४ च्या लोकसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी पक्षाने आज जवळपास नक्की केली. दुसरीकडे युतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला आली आणि पक्षाने तेथे संधी दिली, तर ही निवडणूक ताकदीने लढण्यास तयार असल्याचे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी प्रथमच सांगितले आहे.

दुसरीकडे डॉ. कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी कोण असणार हे पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. शिरूरमधून शिवसेनेचे (शिंदे) उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे अगोदरपासून तयारीत आहेत. आता भाजपचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष असलेले पैलवान आमदार लांडगेंनीही तेथून काल शड्डू ठोकला. त्यामुळे डॉ. कोल्हेंचे प्रतिस्पर्धी हे महेशदादा की माजी खासदार लांडेवाडी, मंचरचे (ता.आंबेगाव) आढळरावदादा असणार याविषयी मतदारसंघात आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे महेशदादांच्या या तयारीने आढळरावदादांचे टेन्शन, मात्र वाढले आहे.

Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol Kolhe
Pimpri-Chinchwad : मंत्रिमंडळ विस्ताराचा आणखी एक मुहूर्त; पिंपरी-चिंचवडचे खाते उघडणार का?

युतीच्या जागावाटपात शिरूर कोणाकडे जाते यावर तेथील उमेदवार कोण असणार हे ठरणार आहे, असे लांडगे म्हणाले. त्यात, जर ही जागा भाजपला (BJP) मिळाली आणि तेथून पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली, तर आपण पूर्ण ताकदीने लढण्यास तयार आहे, असे त्यांनी काल रात्री खेड येथे पटेल यांच्या दौऱ्यात प्रथमच जाहीर केले. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीला एक वर्षे बाकी असल्याने पक्षसंघटना मजबूत करतोय, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्‌टे-पाटील, अतुल देशमुख तसेच राम गावडे, भाजपचे खेड तालुकाध्यक्ष शांताराम भोसले आणि गणेश सांडभोर आदी यावेळी उपस्थित होते. आगामी लोकसभेची जोरदार तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. त्यात त्यांनी आपला खासदार नसलेल्या ठिकाणी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. तेथे पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न त्यांनी जोमाने सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीयमंत्री भाजपचे प्रल्हादसिंह पटेल यांनी शनिवारी व रविवारी शिरुर मतदारसंघाचा दौरा केला. यामध्ये त्यांनी हडपसरला युवक मेळावा घेतला.

शिरुर-हवेलीमध्ये भाजप संघटनेतील सात मोर्चांशी संयुक्तपणे संवाद साधला. भोसरीत विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती, उद्योजक, व्यावसायिकांशी हितगूज केली. खेड-आळंदीत डेहणे गावात आदिवासी जनजाती मेळाव्यातून आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले. जुन्नरला लाभार्थी मेळावा घेतला. आंबेगाव तालुक्यात पारंपारिक खेळ, बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला. या संपूर्ण दौ-यात शिरुर लोकसभा लढविण्यासाठी प्रबळ इच्छुक असलेले महेशदादा आवर्जून उपस्थित होते.

Mahesh Landge, Shivajirao Adharao-Patil and Amol Kolhe
Cabinet Extension News : मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

शिरुर हा युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे आहे. तरीही भाजपने तेथे संघटना बांधणीत कोणतीही कसूर ठेवलेली नाही. त्यांची ही चाचपणी, त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आढळरावांसाठी धोक्याचा घंटा ठरले आहेत. आजपर्यंतच्या दौ-यात हे मंत्री एकदाही आढळरावदादाच्या (Shivajirao Adharao-Patil) लांडेवाडीतील निवासस्थानी गेलेले नाहीत. भाजपचा हा अजेंडा त्यांचे 'टेन्शन' वाढविणारा ठरतो आहे. यापूर्वी केंद्रीय आदिवासीमंत्री रेणुकासिंह यांनी शिरुरचा दौरा केला होता. तसेच यापूर्वी प्रल्हादसिंह पटेल यांनी आंबेगाव तालुक्यात जावूनही आढळरावदादांची भेट घेतली नव्हती. आताच्या दौ-यातही त्यांनी ती घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com