Chinchwad Assembly By-election : चिंचवडमध्ये जगतापांच्या कुटुंबातीलच असणार उमेदवार...

Chinchwad Assembly By-election : केंद्रीय निवडणूक आयोगाने पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे.
Shankar Jagtap, Laxman Jagtap
Shankar Jagtap, Laxman JagtapSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad Assembly By-election : केंद्रीय निवडणूक आयोगाने पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

भाजपचे (BJP) चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे ३ जानेवारीला निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. आता जगताप यांच्या जागी भाजप कोणाला संधी देणार यावर चर्चा सुरु झाली आहे. या जागेवर लक्ष्मण जगाताप यांच्या घरातील व्यक्तीला संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Shankar Jagtap, Laxman Jagtap
Pune By-Election : कसब्यातून काँग्रेस लढणार की निवडणूक बिनविरोध होऊ देणार?

त्यामध्ये जगताप यांचे बंधु शंकर जगताप किंवा लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. जगताप यांचे सर्व पक्षीयांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंधांणमुळे त्यांच्या घरातील कोणी उमेदवार असल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे आता भाजप कुणाला उमेदवारी जाहीर करणार यावर सगळी गणित अवलंबून असणार आहेत.

शंकर जगताप यांच्यावर भाजपने आधीच महापालिका निवडणुकीसाठी जबाबदारी दिली आहे. त्यांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे.

Shankar Jagtap, Laxman Jagtap
Shivsena News : सात लोकांमुळे शिंदें गटाचा गेम फसणार? आयोगाच्या लढाईत ठाकरेंनी टाकला डाव...

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३

अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी

अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी

मतदान : २७ फेब्रुवारी

मतमोजणी आणि निकाल : २ मार्च

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com