पुण्यातील बड्या दुग्ध उद्योगावर 'आयटी'चे छापे अन् 400 कोटींची बेहिशेबी संपत्ती उघड

प्राप्तिकर विभागाने आंबेगाव तालुक्यातील दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित एका बड्या उद्योग समूहावर टाकले होते.
Income Tax Raids
Income Tax RaidsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : प्राप्तिकर विभागाने (Income Tax) आंबेगाव तालुक्यातील दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित एका बड्या उद्योग समूहावर छापे (IT Raids) टाकले होते. या छाप्यांत आतापर्यंत 400 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी उत्पन्न उघड झाले आहे. या प्रकरणी आणखी बेहिशेबी उत्पन्न समोर येण्याची शक्यता प्राप्तिकर विभागाने व्यक्त केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dlip Walse Patil) यांच्या मतदारसंघात झालेल्या या छापेमारीमुळे खळबळ उडाली होती.

प्राप्तिकर विभागाने 25 नोव्हेंबरला पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध उत्पादनांशी संबंधित एका बड्या समूहावर छापे घातले होते. त्यावेळी शोध आणि जप्ती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या छाप्यांत देशभरातील 6 शहरांमध्ये असलेल्या 30 पेक्षा जास्त संकुलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.

या छाप्यादरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि कर चुकवल्याचे पुरावे हाती लागले आहेत. हे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या प्राथमिक छाननीदरम्यान अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. बनावट खरेदी, बेहिशेबी रोख रकमेद्वारे विक्री, रोख रकमेच्या कर्जाचे व्यवहार आणि त्यांचा चुकारा, स्पष्टीकरण देता न येणारे रोखीचे कर्जव्यवहार आदी गैरप्रकाराचा अवलंब करून करपात्र रक्कम लपवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, पशुधनाची विक्री किंवा मृत्यू दाखवून नुकसान झाल्याचे चुकीचे दावे करण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

Income Tax Raids
ठाकरे सरकारचा दणका! परमबीरसिंहांसोबत आणखी एक आयपीएस निलंबित

या उद्योग समूहाने करपात्र उत्पन्नात विशिष्ट कपातीचा दावा करण्यासाठी योग्य प्रकारच्या आणि स्वतंत्र खातेवह्या ठेवल्या नसल्याचे पुरावेही सापडले आहेत.या शोधमोहिमेत रोख रक्कम आणि स्पष्टीकरण नसलेले दागिने असे मिळून सुमारे 2.50 कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल आहे. काही बँक लॉकरची तपासणी अद्याप बाकी आहे. या शोधमोहिमेत आतापर्यंत 400 कोटी रुपयांहून अधिक बेहिशेबी उत्पन्नाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com